ज्वारी, गहू आणि तांदूळ असे 2.5 टन धान्य आमदार बाळाराम पाटील यांच्याकडे केले सुपूर्द
सिटी बेल | पनवेल |
महाराष्ट्रातील एक दुष्काग्रस्त तालुका म्हणून माहीत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत सामाजिक बांधिलकीतून कळंब तालुका चिटणीस बाळासाहेब धस यांनी ज्वारी, गहू आणि तांदूळ असे 2.5 टन धान्य आज पनवेल येथे आमदार बाळाराम पाटील यांच्याकडे रायगडच्या पूरग्रस्तांना मदत म्हणून सुपूर्त केले.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस नगरसेवक गणेश कडू व युवा नेते मंगेश अपराज उपस्थित होते. स्वतः दुष्काळग्रस्त असून देखील आपल्या सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत कळम तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली ही मदत उल्लेखनीय आहे असे गौरवोद्गार यावेळी आमदार बाळाराम पाटील यांनी काढले.








Be First to Comment