
सर्वसामान्यांना न्याय देणारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष- ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष राजा राजापूरकर
पेण (वार्ताहर) : राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देऊन महिला वर्गाला सक्षमीकरणाच्या माध्यमातून प्रगतीपथावर नेणारा राज्यातील एकमेव पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असल्याचे वक्तव्य पक्षाच्या ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष राजा राजापूरकर यांनी पेण येथे केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार तसेच त्यांच्या पत्नी यांच्या वाढदिवसानिमित्त आज पेण येथील कार्यालयात पक्षप्रवेश तसेच महिलांसाठी विविध योजनांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आला होते.
या कार्यक्रमाला ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष राजापूरकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सचिव श्रीहर्ष कांबळे, ओबीसी समन्वयक, प्रकाश चव्हाण, महाड तालुकाध्यक्ष संदीप सकपाळ, पेण तालुकाध्यक्ष प्रकाश मोकल, ओबीसी महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी ठाकूर आदिंसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी ते अधिक म्हणाले की राज्यात ओबीसींचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी पवार साहेबांबरोबर खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा तितक्याच ताकतीने काम करत असून लवकरच येथे त्यांच्या उपस्थितीत ओबीसी महिलांचा कार्यकर्ता मेळावा आपण आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तर रायगड जिल्ह्यात पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असताना येथे अनेक जाती-धर्माचे कार्यकर्ते एक दिलाने काम करत आहेत.शिव शाहू फुले आंबेडकर विचारांचा वारसा लाभलेला या महाराष्ट्रात शरद पवार यांचे नेतृत्वच सर्वसामान्यांसाठी काम करण्याची ऊर्जा देत असल्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी अश्विनी ठाकूर यांचा पक्षात जाहीर प्रवेश करून त्यांना ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली.या नियुक्तीमुळे त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले.





Be First to Comment