सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
रोहा तालुक्यातील सोनगाव गावचे रहिवाशी भास्कर गोळे यांचे वयाच्या ५० व्या वर्षी निधन झाले त्यांच्या आकस्मित निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
भास्कर गोळे हे रोहे शहरात रिक्षा व्यवसाय करीत होते रिक्षा चालक असल्याने ते सर्वाना परिचित होते ते अनेक वर्ष रोहे शहरातील मोरे आली येथील जावई वाडी येथे रहात होते.सर्वांशी मिळुन मिसळून व हसत खेळत रहात होते.ते माळकरी असल्याने त्यांना भजन कीर्तनाची आवड होती एक दिवस अचानक तबेत बिघडल्याने त्याना जाधव नसिँग होम येथे नेण्यात आले.जाधव डॉक्टर यानी मुंबईला नेण्याचा सल्ला दिला.त्यानतंर मुंबई येथे नेत असताना त्यांचे निधन झाले. रोहा रिक्षा संघटनेच्या वतीने समिर शेडगे,रमेश साळवी यानी त्याना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.मुत्यू नंतर त्यांचा रिपोट निगेटीव आला आहे.परंतु कोरोना कल असल्याने त्यांच्यावर रोहा वैकुंठ धाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी व गोळे परिवार आहे कमी वयात त्यांच्यावर मृत्यू ओढवल्याने कुटुंबावर दुखाचे सावट पसरलेले आहे.






Be First to Comment