Press "Enter" to skip to content

“कलादर्पणची” ऑनलाईन गुरुवंदना

सिटी बेल| श्रीनिवास काजरेकर | नवीन पनवेल |

कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘कलादर्पण’ या संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एका संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. या कार्यक्रमात सहभागी कलाकारानी गुरुभक्तीपर अभंग व गीतांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाला गायक अनिरुद्ध भिडे, कलादर्पणच्या अध्यक्ष दिपाली जोशी, सचीव मंजुषा भावे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गुरूपूजन संपन्न झाले. त्यानंतर वेदमूर्ती संदिप जोशी, गणेश घाणेकर व हरेश जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. त्यानंतर सांगितिक कार्यक्रम संपन्न झाला. चैत्राली देसाई, डॉ. शिल्पा वैशंपायन, तन्वी मिनासे, श्रेयस केळकर, वंदना लघाटे, अपराजिता घांगुर्डे, सुखदा मुळ्ये-घाणेकर, किरण बापट, पल्लवी देशपांडे या कलाकारांनी विविध गुरुभक्तीपर रचनांचे सादरीकरण केले.

अशोक देव व प्रतिभा कुलकर्णी यांनी संवादिनी तर गणेश घाणेकर व हर्षद कार्ले यांनी तबलासाथ केली. श्रीनिवास काजरेकर यानी अभ्यासपूर्ण निवेदन करून कार्यक्रमाची उंची वाढवली. सर्वेश गोखले यानी ध्वनीसंयोजन व सतीश बेलापूरकर यांनी छायाचित्रण केले. चंद्रकांत ताह्मनकर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ठ संयोजन व नियोजन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.