Press "Enter" to skip to content

भाऊचा धक्का – मांडवा जलमार्गावर रो पॅक्स सेवा सुरु करावी

ऑल इंडिया पॅसेन्जर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांची मागणी

सिटी बेल लाइव्ह / रायगड / अमूलकुमार जैन #


आगामी गणेशोत्सवासारखा सण लक्षात घेऊन   सोशल डीस्टन्सिंग पाळून  भाऊचा  धक्का – मांडवा- भाऊचा धक्का  या जलर्मार्गावर रो पॅक्स बोट सेवा लवकरात लवकर सुरु करावी अशी आग्रही मागणी ऑल इंडिया पॅसेन्जर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केली आहे. 
त्यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांना लेखी पत्र पाठवून हजारो प्रवाशांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. 
राज्य व केंद्र शासनाच्या आर्थिक सहभागातून १३० कोटी रुपये खर्च करून रो पॅक्स सेवेचा प्रकल्प प्रत्यक्षात आला आहे.  मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कार्यक्षेत्रात भाऊचा धक्का येथे जुन्या मुघल लाईन जेट्टी जवळ यासाठी प्रशस्त पाणटून सहित जेट्टी उभारली आहे.  तर मांडवा बंदर येथे पश्चिमेला ब्रेक वॅाटर सहित जेट्टी उभारली आहे व १५ मार्च २०२० ला प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. 
मात्र कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात दि. २३ मार्च २०२० पासून लॉकडाऊन आहे. परिणाम रो पॅक्स सेवेने वाहतूक सुरु होवू शकली नाही. जलमार्गाने मुंबई ते अलिबाग थेट जोडणारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.  या मार्गावर वाहतुकीसाठी आणलेली रो पॅक्स बोट ही परदेशी बनावटीची असून ती प्रवासी वाहतूकी बरोबरच वाहनांची वाहतूक करण्यासाठी उपयोगात येणार आहे.  ती मजबूत, प्रशस्त, व सुरक्षित आहे.   तिची प्रवासी क्षमता 500 व वाहनांची क्षमता 200 ची आहे. 
सद्य परीस्थितीत प्रवासी संख्या व वाहन संख्या कमी करून सदर वाहतूक सुलभ व फायदेशीर होऊ शकेल. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड हे तालुके पर्यटन क्षेत्र मात्र कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात दि. २३ मार्च २०२० पासून लॉकडाऊन आहे. परिणाम रो पॅक्स सेवेने वाहतूक सुरु होवू शकली नाही. जलमार्गाने मुंबई ते अलिबाग थेट जोडणारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.  या मार्गावर वाहतुकीसाठी आणलेली रो पॅक्स बोट ही परदेशी बनावटीची असून ती प्रवासी वाहतूकी बरोबरच वाहनांची वाहतूक करण्यासाठी उपयोगात येणार आहे.  ती मजबूत, प्रशस्त, व सुरक्षित आहे.   तिची प्रवासी क्षमता 500 व वाहनांची क्षमता 200 ची आहे. 
सद्य परीस्थितीत प्रवासी संख्या व वाहन संख्या कमी करून सदर वाहतूक सुलभ व फायदेशीर होऊ शकेल. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड हे तालुके पर्यटन क्षेत्र म्हणून देशाच्या नकाशावर प्रसिद्धीला आले आहेत.  त्यामुळे पर्यटक प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता तसेच या मार्गावर सध्या कोणतीही सार्वजनिक वाहतूक सेवा नसल्याने शेकडो प्रवाश्यांची गरज ओळखून चांगल्या हवामानाची खात्री करून रो पॅक्स सेवा सुरु करावी असेही चंद्रकांत मोकल यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. 
या सेवेमुळे मुंबई पोर्ट ट्रस्ट व महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाला प्रवासी लेव्ही व जेट्टी भाडे या माध्यमाने आर्थिक उत्पन्न मिळेल. अगामी काळातील गणेशोत्सव लक्षात घेऊन बससेवेवर सोशल डिस्टन्सींगचा पडणारा भार लक्षात घेऊन सदर जलसेवा लवकर सुरु करावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.