सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड नजीकच्या पुई गावचे हद्दीत अर्धवट स्थितीतील बांधकाम करून ठेवलेल्या व अपघातास कारणीभूत ठरत असलेल्या मोरीचे बांधकाम लवकरात लवकर पुर्ण करण्याचे आदेश खा.सुनील तटकरे यांनी दिल्याने अखेर संबंधित यंत्रणेने याची त्वरीत दखल घेऊन मोरीचे बांधकामास युद्धपातळीवर प्रारंभ करण्यात आला आहे.
महामार्गाचे बांधकामात सदरच्या मोरीचे विस्तारीकरण करणे आवश्यक असल्याने संबंधित शासकीय यंत्रणा व ठेकेदार यांच्याकडून तशाप्रकारचे
बांधकामास प्रारंभही करण्यात आला. परंतू मधल्या काळात वाऱंवार बदलेले ठेकेदार,नवे आलेले सरकार व नव्याने रूजू झालेले अधिकारी वर्ग यामुळे सदरचे मोरीचे व महामार्गावरील अन्य बांधकाम यांना म्हणावी तशी गती मिळत नसल्याने गेली पाच ते सहा वर्षें सदरच्या मोरीचे बांधकामही अर्धवट स्थितीतच राहिल्याने फारच मोठी समस्या निर्माण होत होती.अर्धवट मोरी,तिथला अरूंद रस्ता व संबंधित यंत्रणेने याबाबत कोणतीही सुरक्षा न ठेवल्याने इथल्या मोरीचा भाग म्हणजे अपघातासाठी हाँटपाँट ठरत चालला होता.तर आतापर्यंत रात्री बेरात्री विविध प्रकारच्या वाहनांचा अपघात झाले असल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
सदरील मोरी अपघातासाठी हाँटपाँट ठरत असल्याने व भविष्यात पुन्हा एखादी मोठी घटना घडू नये यासाठी खांब- कोलाड विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते यांनी खा.सुनील तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांच्याजवळ याबाबत या गंभीर मोरीची समस्या मांडली असता खा.सुनील तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांनी त्वरीत संबंधित शासन यंत्रणा व ठेकेदार यांना दिलेल्या आदेशान्वये सदरचे मोरीचे बांधकामास युद्धपातळीवर प्रारंभ करण्यात आला आहे. तर याबाबत खा.सुनील तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांचे दैनंदिन प्रवासी,वाहनचालक व स्थानिक रहिवासी वर्गाने आभार मानले आहेत.








Be First to Comment