सिटी बेल | श्रीनिवास काजरेकर | नवीन पनवेल |
येत्या वटपौर्णिमेचे औचित्य साधून ‘सखी’ या महिलांच्या समूहाच्या वतीने गाढी नदीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यामधे वड, कडुलिंब, जांभूळ, बकुळ, ताह्मण, पळस, कदंब अशा विविध वृक्षांची लागवड या परिसरात करण्यात आली. वटपौर्णिमेच्या निमित्ताने वटवृक्षाच्या फांद्या न तोडता त्याऐवजी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रत्यक्ष वटवृक्षाच्या छायेतच पूजन करावे आणि पर्यावरणाचे रक्षण करावे असे आवाहनही करण्यात आले.
सखी समूहाच्या या उपक्रमाला पदाधिकारी दिपाली जोशी, मंजुषा भावे, वैशाली सरदेशपांडे यांच्यासह प्रवीण देशपांडे, प्रसाद जोशी, महेन्द्र घोलप, मिलिन्द गांगल, चंद्रकांत ताह्मनकर, श्रीपाद वैशंपायन, अभिजित कोल्टकर आदी सामाजिक कार्यकर्त्यानीही सहकार्य केले. या झाडांची पूर्ण वाढ होईपर्यंत ‘सखी’ समूह त्यांची जोपासना करणार आहे.










Be First to Comment