Press "Enter" to skip to content

चांगल्या पावसाने शेतकरी नांगरणीच्या कामात व्यस्त

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

भात पेरणीची कामे उरकून शेतकरीवर्ग आता शेतीतील ऊखळण व बेरीच्या कामात व्यस्त झाला असल्याचे दिसून येत आहे.

सध्या कोरोना महामारीने सा-या जगाला पछाडले आहे.तर या यातनामध्ये अधिक भर पडावी म्हणून नुकत्याच चक्रीवादळानेही धुमाकूळ घातल्याने ग्रामीण जीवनावर त्याचा फार मोठा परिणाम झाला असल्याचे
दिसून येत आहे. असे जरी असले तरी कोकणातील शेतकरी हा हार मानणारा नसून या धक्क्यातून सावरून तो आता चालू मोसमातील पावसाळी हंगामातील शेतीच्या विविध कामात तो आता व्यस्त झाला आहे.सुरूवातीलाच दमदार स्वरूपात पावसाने बरसायला सुरुवात केल्याने शेतकरी वर्गाने आपापली भात पेरणीची कामे योग्य कालावधीत पुर्ण केली आहेत.तर चांगल्या पावसाने क्षणाचीही उसंत न घेता आता तो नांगणीच्या ऊखळण व बेरीच्या कामात व्यस्त झाला आहे.

पावसाने चांगली सुरुवात केल्याने व पुढील काही दिवसात तो ब-या पैकी पडतच राहिल्याने पेरणीचे राबही ब-यापैकी रूजून वर आले आहेत. तर शेतीमध्ये गवताचे प्रमाण वाढू नये यासाठी पावसाचे शेती क्षेत्रात साठलेल्या पाण्याचा फायदा घेऊन शेतकरी वर्ग झटपट नांगरणीचे कामात गुंतला असल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.