Press "Enter" to skip to content

रसायनीतील पत्रकार राकेश खराडे पोलीस संघटनेकडून कोरोना योध्दाने सन्मानित


सिटी बेल | रसायनी | प्रतिनिधी |

गेल्या वर्षांपासून कोरोना संसर्गाने जनजीवन विस्कळित झाले आहे.त्याचा संसर्गं कधी,कुठे कोणास होईल हे कोणीही तज्ञ सांगू न शकणारी परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वंत्र या आजाराविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.या संसर्गाची अनेकांना अधिक बाधा झाल्याने काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध वर्तंमानपत्रांसह प्रसिध्दी माध्यमांवर जनजागृती करणाऱ्या पत्रकारांचा आॅल इंडिया पोलिस जनसेवा संघटनेच्यावतीने कोरोना योध्दा सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

यावेळी गेल्या पंधरा महिन्यात रसायनी मोहोपाडा येथील पत्रकार राकेश खराडे यांचे कोरोना कालातील सेवाकार्यांची माहिती उल्लेखनीय असल्याने त्यांना देशातील आॅल इंडिया पोलिस जनसेवा संघटनेकडून कोरोना योध्दाने सन्मानित करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोंगले, राष्ट्रीय उपाध्यक्ष धर्मेंद्र अगरवाल उपस्थित होते.

याअगोदरही रसायनी मोहोपाडा येथील पत्रकार राकेश काशिनाथ खराडे यांच्या कार्याची कोरोना कालात अनेक संघटनांनी दखल घेऊन त्यांना कोरोना योध्दाने सन्मानित केले आहे.त्यांना आॅल इंडिया पोलिस संघटनेकडून कोरोना योध्दाने सन्मानित केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान प्रत्येक नागरिकाने सोशल डिस्टिंक्शन पालन करुन मास्कचा वापर करावा.सॅनिटायझर वापरून स्वतःची व कुटूंबाची कालजी घेऊन कोरोनाला परिसरातून हद्दपार करावे असे आवाहन पत्रकार राकेश खराडे यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.