Press "Enter" to skip to content

विज ग्राहकांच्या समस्या सोडविण्याची महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेची मागणी

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रायगड जिल्ह्यात महावितरणचे घरगुती व व्यापारी मिळून सुमारे 6 लाख 40 हजार ग्राहक आहेत. या ग्राहकांचा वीजपुरवठा, नवीन जोडणी, चुकीची बिले, ग्राहक सेवा इत्यादी समस्यांचे निराकरण लवकरात लवकर व नियमानुसार व्हावे या मागणी साठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना संस्थापक अध्यक्ष प्रतापराव होगाडे व कोकण समन्वयक अँड. सुहास बने यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष व रायगड जनता दलाचे जनरल सेक्रेटरी रसायनी येथील विजय खारकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी १८ जून २०२१ रोजी पेण सर्कलचे अधिक्षक अभियंता दिपक पाटील यांच्या कार्यालयात बैठक घेऊन विविध मागण्यांचे पत्र त्यांना दिले. या सर्व समस्यांचे निराकरण झाल्यास वीज ग्राहक व महावितरण कंपनी या दोघांचे हित आहे असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना रायगड अध्यक्ष विजय खारकर यांनी नमुद केले. तर कामचुकार व अरेरावी करणाऱ्या आधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अलिबाग तालूका अध्यक्ष सचिन पाटील यांनी केली.तक्रारी नोंदणी साठी २४ तास यंत्रणा कार्यान्वित ठेऊन नियमानुसार वेळेवर तक्रारींचे निवारण व्हावे असे संघटनेचे सदस्य रवी पाटील यांनी सांगितले. यावेळी महावितरण कंपनी पेण सर्कलचे अधिक्षक अभियंता दिपक पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून रायगड जिल्ह्यातील ग्राहकांना येणाऱ्या समस्यांचे कमीत कमी वेळेत निवारण करुन अधिकाधिक चांगली सेवा देण्याचे आश्वासन दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.