पेण तालुक्यातील वडखळ, मलेघर, डोलवी, गडब, आमटेम या 5 ग्रामपंचायतीच्या ससरपंचांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
सिटी बेल | पेण | वार्ताहर |
मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पेण तालुक्याचा अधिक विकास करून या विकासात्मक कामातून येथील ग्रामपंचायतींना श्रीमंत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पेण तालुक्यातील वडखळ, मलेघर, डोलवी, गडब, आमटेम या 5 ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज वडखळ येथे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, तालुकाध्यक्ष दयानंद भगत, जिल्हा सरचिटणीस जगनशेठ म्हात्रे, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, युवक चे अध्यक्ष उदय जवके, पेण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संतोष श्रृगांरपुरे,माजी उपसभापती गजानन बोरकर, विकास पाटील, मंगेश नेने आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना खासदार तटकरे म्हणाले की पेणच्या गणेश मुर्तीकारांचे तसेच खारेपाटातील पाणी प्रश्न यावर कोणतेही राजकारण न करताना आपली जबाबदारी पार पाडून सदर प्रश्न मार्गी लावण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे. वाशी शिर्की भागाची पाईप लाईन ठेकेदारामुळे अर्धवट राहिली त्या ठेकेदाराला काल्या यादीत टाकून यावर तात्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यां बरोबर बैठका घेऊन पाणीप्रश्न मार्गी लावण्यात येत आहे. तसेच तालुक्यातील हेटवणे धरणाच्या पाण्याचे ओलीताखाली क्षेत्र आले त्यासाठी प्रयत्न करून प्रत्येक गावाला पाणीपुरवठा होणार आहे.
वडखळच्या विकासा करीता आपण प्रयत्नशील असून जेएसडब्ल्यू कंपनीत स्थानिकांनाच प्राधान्य दिले पाहिजे जसे नागोठणे आयपीसीएल प्रकल्पात अनेकांना नोकरी मध्ये सामाविष्ट केले त्याच पध्दतीने या कंपनीत सुद्धा स्थानिकांना रोजगार मिळालेच पाहिजे.महिलांनाही वेगवेगळ्या बचत गटाच्या माध्यमातून रोजगार मिळाला पाहिजे तसेच या ग्रामपंचायतींच्या येत्या तीन चार महिन्यांत उर्वरित कामांना गती देऊन मंजूरी देण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.यावेळी विरार अलिबाग कॅरिडॉर साठी भूसंपादन करण्यात येत असणाऱ्या शेतकऱ्यांनी खासदार सुनील तटकरे यांना याबाबतचे निवेदन दिले.
तर या पक्षप्रवेशाबद्दल बोलताना वडखळ सरपंच राजेश मोकल म्हणाले की पेण तालुक्यात अधिक विकास साधायचा असेल तर खासदार सुनिल तटकरें यांच्या शिवाय पर्याय नाही त्यामुळे आम्ही पाचही सरपंचानी योग्य निर्णय घेतला असून तालुक्यात पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून येणाऱ्या काळात यापेक्षाही जास्त सरपंच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.








Be First to Comment