एकाच दिवसात चार विचित्र आपघात
सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गाची परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे तसेच कोलाड नागोठणे दरम्यानचा मार्ग हा तर चक्क प्रवासी वर्गाच्या जीवावरच बेतला असल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर खांब नजीक पुगाव जवळ मार्गाच्या मधोमध भला मोठा खड्डा पडला असल्याने वाहाणे चक्क या खड्ड्यात आदळून आपघात होत आहेत.
एकाच दिवसात चार विचित्र आपघात घडले असल्याचे संकेत मिळाले असून सदरच्या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत तर आपघातग्रस्थांचे दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी टळली असे सर्वत्र बोलले जात असून या खड्ड्याबाबत एकच खळबळ माजली आहे .
मुबंई गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करणाच्या कामाबाबत ठेकेदाराने तर अक्षरशः खिल्ली उडवली असल्याचे समोर आले आहे तर कित्येक वर्षे रखडले आहे तसेच नागोठणे कोलाड दरम्यानची सडक नुकतीच मे महिन्यात नव्याने डांबर टाकून बनवली होती परंतु आता पहिल्याच सुरू झालेल्या पावसात त्याची अक्षरशः दाणादाण उडाली असल्याने पडलेले भगदाड खड्डे आता प्रवासी वर्गाच्या जीवावर उठले आहेत नागोठणे खांब कडून कोलाड कडे जाणारा मार्ग पुगाव जवळ रस्त्याच्या मधोमध पडलेला हा भला मोठा खड्डा या खड्ड्यात पावसाचा पानी साचल्याने सदरचा भला मोठा खड्डा वाहन चालकांच्या नजरेत येत नसल्याने या खड्ड्यात वाहनांचे चाक गेल्याने सदरच्या वाहनांची स्टेरींग जॅम होऊन ती वाहन उडून सडकेच्या खाली जाऊन एकाच दिवसात दोन मोटर बाईक व दोन फोर व्हीलर गाड्या असे चार विचित्र आपघात घडले असल्याने या बाबत सर्वत्र एकच खळबळ माजली आहे .

कोरोना मानेवर तर सडकेवरील खड्डे नागरिकांच्या जिवावर अशी अवस्था निर्माण झाली आहे मागील चार पाच दिवसांपूर्वी रायगडचे खासदार सुनील तटकरे साहेब यांनी स्वतः ठेकेदाराने केलेल्या कोलाड नागोठणे दरम्यानच्या कामांची पाहणी केली तसेच लवकरात लवकर काही दुरुस्तीचे आदेश देखील दिले आहेत मात्र अशा या ठेकेदाराला काहीही पडलेले दिसत नाही पाहणी करताच दुरुस्ती सुरू केली असे काही वृत्त पत्रात बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या पण हे खड्डे आता दिवसंदिवस प्रवासी वर्गाच्या जीवावर वेतले आहेत खांब, मुठवली, पुगाव,पुई ,या गावांकडे वळण घेण्याच्या मधोमध हे खड्डे पडले आहेत त्यामुळे आपघात देखील होत आहेत मागील मे महिन्यात या सडकेवर डांबर टाकली लॉक डाऊन कोरोनामुळे वाहनांची वर्दळ देखील कमी प्रमाणात झाली मात्र अनलॉक झाले वाहने सुरू होताच खड्डे पडले आहेत या कामांचा काय निकष आहे असा सवाल निर्माण झाला आहे तरी लवकरात लवकर हे खड्डे भरण्यात यावे यासाठी संबधित अधिकारी वर्गाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष केंद्रित करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सावंत यांनी केली आहे.








Be First to Comment