आजच्या युगात माणसाने निसर्गाचा विचार करणे गरजेचे : ॲड.रंजना धुळे
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कोरोनाच्या काळात माणसाला खऱ्या अर्थाने वृक्षांचे महत्व समजले आहे. आपल्या आजूबाजूला सिमेंटचे जंगल वाढत आहे. तर त्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देत आला आहे मात्र आपण त्याच्यावर अन्याय करत आलो आहोत. तेव्हा आजच्या युगात माणसाने निसर्गाचा विचार करणे गरजेचे आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या कर्जत तालुकाध्यक्ष ॲड.रंजना धुळे यांनी व्यक्त केले आहे. उमरोली येथील वृक्ष लागवड कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

उमरोली ग्रामपंचायतीचे सदस्य असलेले भास्कर लोंगले यांनी 1 हजार वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. उमरोली येथील टेकडीवर ही झाडे लावून ती जगवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. भास्कर लोंगले हे दरवषी विविध निमित्ताने वृक्ष लागवड करत असतात. तर यावेळी कोरोनाचा उद्रेक त्यात कृत्रिम प्राणवायूची कमतरता यामुळे त्यांनी 1 हजार वृक्ष लागवडीचा निर्धार केला. तर अनेकांनी त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. वृक्ष लागवड करणे सोपे आहे मात्र पोटच्या मुलांप्रमाणे त्यांची काळजी घेऊन त्यांचा सांभाळ करणे कठीण असते. मात्र आम्ही वृक्षांची जोपासना करतो त्यामुळे लावलेले वृक्ष हे आज फुलताना पाहून समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया भास्कर लोंगले यांनी दिली आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सागर शेळके, उमरोली ग्रामपंचायत सदस्य प्रचिती गायकर, उक्रुळ ग्रामपंचायत सरपंच वंदना थोरवे, माजी उपसरपंच ऋषिकेश भगत, नवतरुण मित्र मंडळ उमरोली अध्यक्ष विनोद लोंगले, संतोष थोरवे, मनसेचे तेजस तुपे, पंकज बुंधाटे, सचिन गायकर, जितेंद्र रुठे, दिलीप लोंगले, अभिजित लोंगले, रोहन लोंगले, डॅनी लोंगले, राजेंद्र लोंगले, संदीप मोरे, माजी सरपंच महादेव लोंगले, विजय लोंगले, परशुराम लोंगले, रामदास तुपे, नरेश लोंगले आदी उपस्थित होते.








Be First to Comment