Press "Enter" to skip to content

आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

खालापूर तालुक्यातील छत्रपतींच्या लढाईची जिवंत साक्ष असलेल्या उंबरखिंड जवळील चावणी येथील आदिवासी वाडीवर ‘आदित्य-जनसेवा सप्ताह’या उपक्रमाचा समारोह संपन्न झाला.मावळ लोकसभा संपर्क प्रमुख,युवासेना राज्य विस्तारक,राजेश पळसकर यांच्या संकल्पनेने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आदिवासी वाडीतील मुलांना खाऊ,खेळणी,शालोपयोगी वस्तू, अल्पोपहार,मास्क,फळं व इतर अन्य वस्तूंचे वाटप करण्यात आले.संपूर्ण मावळ प्रांतात सात दिवस सामाजिक उपक्रम राबवून सांगता खालापूर तालुक्यात करण्यात आली.

या कार्यक्रमाला युवासेना सहसचिव,राज्य विस्तारक तसेच अवजड वाहतूक सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील,मावळ युवा अधिकारी अनिकेतजी घुळे,अतुल राजूरकर,रायगड जिल्हा उपाध्यक्ष भानुदास कोळी,पनवेल कार्याध्यक्ष रोशन पवार तसेच मावळ आणि रायगड मधील अन्य पदाधिकारी व चावणी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.अवजड वाहतूक सेनेचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष अरुण गायकवाड,जिल्हा सचिव श्रीधरओझरकर,साबळे,तालुका संघटक अकबर जळगावकर यांचे सहकार्य कार्यक्रमास लाभले.

चैतन्य मळेवाडकर यांनी प्रास्ताविक सादर करून मनोगत व्यक्त केले तर अरुण गायकवाड यांनी ग्रामस्थांच्या इतर समस्या सोडवण्यासाठी सुद्धा कटिबद्ध असल्याचे आश्वासन या माध्यमातून दिले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा वाढदिवस आशा रीतीने साजरा करून शिवसेना,युवासेना आणि अंगीकृत संघटनांच्यावतीने सामाजिक कार्याची परंपरा निरंतर ठेवण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.