सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
आत्मा योजने अंतर्गत शेतकरी वर्गांस मोठ्या प्रमाणे सहकार्य करीत असून या माध्यमातून डोंगराळ तसेच माळरान पठारावर १० शेतकरी बांधवांनी एकत्र ऐवून कणगर लागवड करण्यात आली.
या कंदमुळे यांना पावसाचे पाणी मुबलक प्रमाणात मिळत असल्यामुळे यांची वाढ मोठ्याप्रमाणावर होवून मोठ्याप्रमाणावर कणगर मिळत असते.यांस कंदास किंवा पांढरी रताळी सुद्धा म्हटले जाते.सुरुवातीला या ठिकाणी दोन शेतकरी लागवड करीत होते.मात्र कृषी खात्याच्या माध्यमातून मार्गदर्शन केल्यास दहा शेतकरी वर्ग ही कणगर लागवड करण्यास तयार झाले.

पुर्वी मोठ्या प्रमाणात कंदमुळे आणी भाजीपाल्याची लागवड केली जात होती.मात्र जस जसे औद्योगिक करणांचे जाळे पसरले आणी शेतकरी वर्गांनी शेती कडे पाठ फिरवत चालले आहे.शेतकरी वर्गास शेतीतून अधिक उत्पन्न मिळवून तो सक्षम होवू शकतो.यासाठी त्यांनी मेहनत करणे महत्वाचे आहे.शिवाय दर वर्षी तालुक्यातील शेतकरी वर्गांस प्रशिक्षण शिबीर ही देण्यात येते यामुळे शेतकरी वर्ग शेतीकडे वळले जातील आणी या माध्यमातून अधिक उत्पन्न घेण्यास तो सक्षम होईल. शेतकरी वर्गांनी एकत्र घेवून कंदमूळ आणी भाजीपाला लागवड कश्या पद्धतीने करावी यांचे प्रात्यक्षिके करण करुन दाखविले.
कणगर लागवड केल्यास १८० ते २०० दिवसांत पुर्ण होत असते.त्याच बरोबर पारंपरिक पद्धतीने कंदमूळ आणी भाजीपाला लागवड तसेच बियाने बद्दल व त्यांचे उत्पन्न वाढविणे अथवा विक्री अथवा व्यवस्थापक या विषयांचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी अधिकारी यांनी बिबळावाडी( दुरशेत ) येथे घेण्यात आलेल्या खरीप हंगामातील कंदमूळ आणी भाजीपाला लागवड शेतकरी, महिला वर्गांना प्रशिक्षण देतांना म्हणाले.यावेळी नाचणी तुर बियाणे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाला आत्मा योजनेचे मोठे सहकार्य मिळत असल्याचे तालुका कृषी अधिकारी- अर्चना सुळ, ,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक – प्रज्ञा पाटील, कृषी सहाय्यक उदय भोसलेयांचे मोलाचे योगदान शेतकरी वर्गास लाभत आहे.








Be First to Comment