सिटी बेल | खांब-रोहा | नंदकुमार मरवडे |
भाताची रोपं वाढण्यासाठी पडत असलेल्या दमदार पावसामुळे सद्य स्थितीत भाताची रोपं चांगलीच तरारली असल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे.
या वर्षीच्या पावसाळी हंगामात सुरूवातीपासून चांगल्या पद्धतीने बरसत असलेल्या पावसामुळे व पेरणीलायक पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाने आपापली पेरणीची कामेही योग्य वेळेत पुर्ण केली.तर सद्य स्थितीत कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे भाताची रोपंही चांगलीच तरारल्याने शेतकरी वर्गही समाधानी दिसत आहे.मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वरकस पट्टयात करण्यात आलेल्या धुळवाफेच्या पेरणीची रोपं तर चांगलीच बहरली आहेत.
भातशेतीच्या कामालायक पडत असलेल्या पावसामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त केले जाऊ लागले आहे. तर पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर पुढील हंगामातील भात लागवडीची कामेही योग्य वेळेत पुर्ण होतील.असा अंदाज शेतकरी वर्गातून व्यक्त केला जाऊ लागला आहे.दरवर्षाच्या मानाने या वर्षी मात्र पाऊस ब-यापैकी पडत असल्याने शेती क्षेत्रासह अन्य क्षेत्रातूनही समाधान व्यक्त केले जाऊ लागले आहे.








Be First to Comment