Press "Enter" to skip to content

वृक्ष लावा,ऑक्सिजन ची पातळी वाढवा : तरुणांनी दिला संदेश

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून तरुण वर्गांनी स्मशानभुमी आणी रस्त्याच्या दुतर्फा च्या ठिकाणी वृक्ष लागवड करुन त्यांचे संवर्धन करण्याचा संदेश या माध्यमातून दिला त्याचबरोबर ऑक्सिजन ची पातळी वाढविण्यास मदत होइल,आज रस्तेचे रुंदीकरण साठी मोठ्याप्रमाणावर वृक्ष तोड केली जात आहे.मात्र ती पातळी भरुन काढावी यासाठी रस्त्याच्या दुतर्फा च्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली.त्याच बरोबर मानवी मृत्यूनंतर चे चिरस्थांन असलेली स्मशानभुमीत वृक्ष लागवड केली अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईक यांना उभे राहण्यासाठी सावळी मिळावी शिवाय पर्यावरणाचा समतोल आबाधित राहावे या दृष्टीकोणातून हा कार्यक्रम हाती घेतला.

पुर्वी अनेक प्रकारची झाडे या मध्ये वनऔषधी सुद्धा होती.संपूर्ण ठिकाणी वृक्षच होती.मात्र विविध कारणास्तव वृक्षांची तोड मोठ्याप्रमाणावर झाल्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे.मात्र निसर्गाचे बदललेले चित्र थांबविण्यांची ताकद वृक्षामध्ये असून वृक्ष लागवड आणी त्यांचे संवर्धन हा कार्यक्रम हाती घेण्यात आले.कोरोनांच्या काळात ऑक्सिजनची किती मोल आहे.यांचे समिकरण ओळखून आज विविध कार्यक्रमात वृक्ष लागवड चा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

वृक्ष लागवड करा,त्यांचे संवर्धन करा,पर्यावरणांचा समतोल अबाधित ठेवण्यासाठी वृक्ष लागवड करणे अतिषय महत्वाचे आहे यामुळे ग्रूप ग्राम पंचायत माजगांव हद्दीतील असलेले माजगांव,आंबिवली,वारद,येथिल रस्ते,स्मशानभूमी तसेच मोकळी जागेत कडूनिंब, वड, पिंपळ, गुलमोहर, करंज,वृक्ष लागवड करण्यात
यावेळी वृक्ष लागवडीस ग्रूप ग्राम पंचायत सदस्य,ग्रामस्थ तरूण वर्ग उपस्थित राहून वृक्ष लागवड करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.