सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी द्रोणागिरी हायस्कुल करंजा एस एस सी बॅच १९८९ च्या विद्यार्थी तसेच आजचे करंजा गावातील नागरिक यांनी वृक्षलागवड व संवर्धन हा उपक्रम राबवित वृक्षारोपण केले.
या कार्यक्रमाची मूळ संकल्पना राबविताना परेश म्हात्रे व देविदास थळी, ऍड. रमाकांत पाटील यांनी पर्यावरणविषयक आस्था आपल्या विचारातून मांडली. तसेच अनेक उपक्रम यापुढे ही राबवू असे मनोगतुन व्यक्त केले.
या कार्यक्रमास ग्रुप ग्रामपंचायत चाणजे सरपंच मंगेश थळी, करंजा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गोविंद थळी, चाणजे जमीन बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश म्हात्रे, द्रोणागिरी इंग्रजी माध्यम चेअरमन सौ गीता भगत , कामिनी, रंजना, भवानी कोळी, नरेश, गजानन, किरण कोळी, सोमनाथ, अनिल, शशांक, अमोल म्हात्रे तेलिपाडा ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष अमोल म्हात्रे, परेश म्हात्रे, देविदास थळी सरचिटणीस उरण तालुका काँग्रेस कमिटी, लेखक व कवी प्रशांत पांचाळ तसेच द्रोणागिरी हायस्कूल मराठी माध्यम १९८९ बॅच चे सर्व माजी विद्यार्थी हजर होते.








Be First to Comment