जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेश !
सिटी बेल लाइव्ह / रायगड /अमूलकुमार जैन #
रायगड जिल्ह्यातील अलिबाग,रोहा आणि मुरूड या तीन तालुक्याना जोडणाऱ्या साळाव रेवदंडा पुलाला संभाव्य धोका लक्षात घेऊन या पुलावरून अवजड वाहतुकीस बंदी घालण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहे.
रेवदंडा पूल जीर्ण झाला आहे, वारंवार धडकणाऱ्या बार्जेसमुळे पुलाला धोका असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पावसाळ्यात या पुलाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी 21 जून ते 30 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये रेवदंडा पुलावरुन होणारी अवजड वाहतूक (12 मॅट्रीक टनापेक्षा जास्त भारवहन असणारी वाहने) पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.त्यामुळे
अलिबाग, वावे ते चौल-रेवदंडा, सहाण पाले ते नागाव ते रेवदंडा या मार्गावर वाहतूक करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत.
अलिबाग ते वावे ते चौल-रेवदंडा,सहाण पाले ते नागाव ते रेवदंडा या मार्गावरुन होणारी अवजड वाहतूक बंद करुन ही अवजड वाहतूक अलिबाग ते वडखळ, वडखळ ते रोहा, रोहा ते साळाव या मार्गे करण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेश जारी केले आहेत






Be First to Comment