Press "Enter" to skip to content

कोलाडमध्ये रानभाज्यांची आवक वाढली

कोरोना काळात आदिवासी भगिनींना मिळत आहे आर्थिक उत्पन्न

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

पावसाळी हंगामात डोंगरमाथ्यावर तयार होणाऱ्या राधभाज्यांची आवक कोलाडमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने या भाज्यांना खवय्यांची चांगली पसंती मिळत आहे.

आरोग्याच्या द्रुष्टीने रानभाज्यांना फार महत्त्व असल्याने व आयुर्वेदिकद्रुष्ट्या या भाज्या अत्यंत लाभदायक ठरत असल्याने या भाज्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.त्यामुळे आदिवासी भगिनींना आपल्या हक्काचे उत्पन्नाचे साधन प्राप्त झाले आहे. संधीवात, मधूमेह व पोटाचे विकारांवर या भाज्या लाभदायक ठरत असल्याचे आयुर्वेद तज्ञांचे मत आहे. या भाज्या पावसाच्या आगमणाबरोबर लगेचच जमिनीवर नैसर्गिक पद्धतीने उगवत असल्याने यांचे सेवणाने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत.

टाकळा,भारंगा,कुडा,शेवळा,तेरी आदी रानभाज्या सध्या विक्रीसाठी आणल्या आहेत.तर थोड्याच दिवसात तयार झाल्यावर भोवरीची व आळूची पाने,करटोळी यासह अन्य भाज्या विक्रीसाठी आणल्या जातील असे आदिवासी भगिनींचे म्हणणे आहे. तर बेसुमार होत चाललेली जंगलतोड, जंगलात लावले जाणारे वणवे यामुळे रानभाज्या शोधण्यासाठी खुप वेळ जातो. घरची मुले व पुरुष रानोमाळ भटकून रानभाज्या गोळा करतात तर आम्ही.महिला बाजारात त्यांची विक्री करीत असल्याची माहिती एका महिलेने दिली आहे.सध्या कोरोना महामारीमुळे हाताला कोणत्याही प्रकारचा कामधंद्या नसल्याने रानभाज्या या कुटूंबाला चांगला आधार देत आहेत असेही सांगितले

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.