Press "Enter" to skip to content

सर्वत्र वलगणीचे मासे मारण्याची एकच लगबग

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

९ जून पासून पावसाच्या सरीवर सरी कोसळू लागल्याने व सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नदी,नाले,ओढे आदी ठिकाणी वलगणीचे मासे मारण्यासाठी खवय्यांची एकच लगबग सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

पहिल्याच दमदार पावसात मासे अंडी सोडण्यासाठी नदीपात्रातून बाहेर पडतात व अंडी सोडण्यासाठी मिळेल ती वाट पकडतात.मासे अंडी सोडण्याच्या या प्रसंगाला वलगन लागली असे म्हणतात. तर पहिल्याच वलगणीचे मासे पकडण्यासाठी नदी किनारी, नाले,ओढै,शेतीचे पानथळ क्षेत्रात खवय्यांची अक्षरक्ष: गर्दी उसळते.तर यावर्षीचे पावसाळी हंगामात वलगीनी लायक पाऊस पडल्याने सर्वत्र मोठीच वलगन चढली असल्याने गेल्या दोन दिवसापासून वलगणीचे मासे पकडण्यासाठी खवय्यांची सर्वत्र एकच गर्दी उसळली असल्याचे पहावयास मिळत आहे.

या वलगणीत शिवडे,वाम,खरबू,खडे आदी मासे मोठ्या प्रमाणावर मिळत असल्याने चांगली वलगन लागल्याने खवय्यांचे पुरते समाधान झाले आहे.

गेल्या तीन-चार दिवसापासून वलगणीलायक पाऊस पडल्याने चांगली वलगण लागल्याने खवय्यांचे पुरते समाधान असल्याची प्रतिक्रिया रोठ बु. वलगणीतील माहितगार नितिन वारंगे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.