Press "Enter" to skip to content

जिल्हयातील रूग्णालयांत रेमडीसीवीर १०० एमजी इंजेक्शन तातडीने उपलब्ध करा !

वंचित बहुजन आघाडीचे कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे यांची मागणी

सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे #

रायगड जिल्हयात कोरोनाचे रूग्ण खुप मोठया संख्येने वाढत आहेत.अनेक रूग्ण दगावले सुद्धा आहेत.कर्जत मध्ये सुद्धा रूग्णाची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे.तसेच सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे इतर सुद्धा आजाराचे रूग्ण आहेत. त्यामुळे अत्यावस्थ रूग्णांना रेमडीसीवीर १०० एमजी इंजेक्शन (Remdesivir 100 mg injection) दिल्यास रूग्णांना श्वास घेण्यास होणारा ञास हा कमी होऊ शकतो आणि रूग्ण त्यातून बरा होऊ शकतो असे अनेक डॉक्टरांचे मत आहे.सदर इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे अनेक रूग्णांना आपला जीव देखील गमवावा लागत आहे.त्यामुळे हे इंजेक्शन सर्वत्र उपलब्ध करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे यांनी केली .
आज दि. २३ जुलै २०२० रोजी वंचित बहुजन आघाडी तालुका कर्जत यांचे वतीने वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय कर्जत, तालुका आरोग्य अधिकारी, कर्जत यांचे मार्फत जिल्हा शल्यचिकित्सक अलिबाग-रायगड यांना निवेदन दिले आहे की, रायगड जिल्हयातील सर्व तालुक्यातील सर्व रूग्णालयात आणि खासकरून कर्जत सारख्या तालुक्यातील सर्व रूग्णालयात सदर औषधाची जास्तीत जास्त उपल्बधता तातडीने करावी अशी मागणी केली आहे.यावेळी तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे, शहर पदाधिकारी लोकेश यादव उपस्थित होते.त्यांच्या या मागणीने कोरोना बाधित व इतर श्वसनश्वास च्या रुग्णांना याचा फार फायदा होणार आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.