Press "Enter" to skip to content

कुंडलिका नदीवरील पुलाचे तिसऱ्या वर्षीच तीन तेरा

पहिल्याच पावसात पुलावर तळ्याचे स्वरूप, प्रवाशांच्या जिवाला धोका

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड येथील कुंडलिका नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या कामाचे तिसऱ्या वर्षीच तीनतेरा वाजले असुन या पुलावरील रस्ता उखडला असुन या पुलावर पहिल्याच पावसात पाणी साचून पुलाला तळयाचे स्वरूप प्राप्त झाले असून यातून मार्ग काढतांना प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याच्या चौपदरीकरणात कोलाड कुंडलिका नदीवरील नवीन पुलाचे काम गेली तीन वर्षां पासुन पुर्ण झाला खरा परंतु या पुलाचे काम एवढे निस्कृष्ठ दर्जाचे आहे की या पुलाच्या मधोमध मोठा खड्डा पडून पुलाला वापरण्यात आलेले स्टील (तारेचे गज) वरती निघालेले असून यामुळे वाहन चालक व प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

ब्रिटिश काळीन बांधण्यात आलेले पूल पन्नास वर्षे झाली तरी त्यांना काही भंग होत नव्हते परंतु मुंबई-गोवा हायवे वरील चौपदरी करण्याच्या कामात कोलाड कुंडलिका नदीवरील नवीन पुलाचे काम तीन वर्षांपूर्वीच पुर्ण केले असुन सुप्रीम कंपनी कडून एवढे सुपर काम केले आहे की तीन वर्षात या पुलाचे कामाचे तीनतेरा वाजले असुन या जीवघेण्या पुलाची संबंधितांनी पहाणी करुन योग्य ती दुरुस्ती करावी अशी मागणी पुई ग्रामपंचायत माजी सरपंच असिफशेठ सैय्यद यांनी केली आहे

मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड हे बाजार पेठेतील मध्यवर्ती ठिकाण असुन य़ा मार्गावर शाळा, कॉलेज, तलाठी कार्यालय, पोलिस स्टेशन, बँका, गजबजलेली बाजापेठ असल्याने कोलाड परिसरातील आजूबाजूला असणाऱ्या ३५ते ४०गावातील नागरिक येथे येत असलेल्या नागरिकांनमुळे येथे मोठी वर्दळ दिसुन येते.तर मुंबई गोवा पुणे आदी ठिकाणी जाणारी येणारी वाहने यांची देखील मोठया प्रमाणावर वाहतुक सुरु असते यामुळे या पुलावरील उखडलेल्या रस्त्यामुळे पुलाला वापरण्यात आलेले स्टील वर निघाले आहेत शिवाय या खड्डयामुळे पहिल्याच पावसात या पुलाला तलावाचे स्वरूप निर्माण झाले असून यातुन मार्ग काढतांना वाहनचालक यांना तारेवरची कसरत करावी लागत असुन यामुळे प्रवाशी वर्गाच्या जिवाला धोका निर्माण झाला असू यामुळे संबंधितांनी याकडे त्वरीत लक्ष देऊन योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी प्रवाशी वर्गाकडुन केली जात आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.