सिटी बेल | धाटाव | शशिकांत मोरे |
सरकार दरवर्षी ‘झाडे लावा झाडे लावा’ ही संकल्पना राबवून वृक्ष लागवड करते; पण त्याचे संवर्धन आपण करीत नाही. म्हणून वृक्षारोपण करण्यासाठी आपण सर्वांनी स्वत:हून सहभाग घेतला पाहिजे.पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान,भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपणच नव्हे तर त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे असे मत आ.अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२ व्या वर्धापदिनानिमित्त धाटाव येथील आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस विजय मोरे,सरपंच सुवर्णा रटाटे,उपसरपंच यशवंत रटाटे,सदस्य अशोक मोरे सर्व सदस्य,सदस्या,दता चौहान,उत्तम म्हस्कर,सूर्यकांत मोरे,खेळू रटाटे,केशव भोकटे,नथुराम मोरे, ग्रामविकास अधिकारी दीपक चिपळूणकर, पोलीस.पाटील कृष्णा रटाटे यांसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत हद्दीतील गाव वाड्यांवर नारळ,गुलमोहर,निलगिरी यांसह असंख्य जातीच्या एकूण ३०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.








Be First to Comment