Press "Enter" to skip to content

जिद्दीच्या जोरावर टोमॅटोच्या व्यवसायातून यशाकडे वाटचाल

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

सर्वसामान्य गरीब जनता केंद्रीय अर्थसंकल्पाच्या स्फोटाने,कानाने बहिरी,तोंडाने मुकी आणि डोळे असूनही आंधली झाली आहे.जनतेला जिवनावश्यक वस्तू कुवतीबाहेरच्या वाटू लागल्या आहेत.त्यातच कोरोनासारखी महामारी,निसर्गात होणा-या बदलामुले उदभवलेली परिस्थिती यामुळे हातावर पोट भरणा-यांची बिकट अवस्था झाली आहे.

जिवनावश्यक वस्तूंचे भाव भरमसाठ वाढल्याने गरीब आणि मध्यमवर्गीयांना एक वेळ उपवास करण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने “कधी येणार अच्छे दिन”याची सर्वसामान्य माणूस वाट पाहत आहे.परंतु कोरोनाकालात होत्याचे नव्हतं झाल्याने कुटूंबाची गुजराण करण्यासाठी काहीतरी करावेच लागेल.या विचाराने सैरावैरा झालेल्या मोहन दत्तू ताकमोगे यांनी मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतील शिवाजी चौकात टोमॅटो व्यवसाय सुरू करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला.काही दिवसांत टोमॅटो व्यवसाय वाढवून ते चांगले कमाईं करु लागले.टोमॅटो व्यवसायात दुप्पट पैसे कमवता येतात असे मोहन ताकमोगे यांचे म्हणणे आहे.

गरिबीचे संकट आल्यावर शांत न बसता काहीतरी व्यवसाय करावा, त्यातून नक्कीच फायदा होईल.नोकरी न मिळाल्यास घरी बसून न राहता काहीनाकाही प्रयत्न करीत राहावे असे तरुणपिढीला मोहन ताकमोगे यांनी आवाहन केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.