Press "Enter" to skip to content

हवामान खात्यांचा अंदाज खरा ठरला,शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

भारतीय हवामान विभागाने दिनांक ९ ते १२ जुन या कालावधीमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिलेला आहे.यामुळे काल सायंकाळ पासून पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी यांच्या आश्या पल्लवीत झाल्या आहेत.यामुळे शेतकरी वर्गांनी भात पेरणी सुरु केली होती पाउस चांगला झाला तर शेतकरी वर्गांनी टाकल्या राब चांगले तयार होणार असून लवकर भात लागवड सुद्धा होइल मात्र यासाठी पावसाने उत्तम हजेरी लावली पाहिजे.

पावसाळा सुरु झाला की,तालुक्यातील असलेले शेतकरी वर्ग शेतीसाठी सज्य झालेले असतात.मात्र पावसाने चांगली साथ दिली तर शेतकरी वर्ग मातातून सोनं पिकविले जात असतात.सकाळ पासून पडत असलेल्या पावसाने शेतकरी वर्गांस चांगला दिलासा दिल्यामुळे शिवाय शेती ही पावसाच्या पाण्यामुळे भिजल्यामुळे शेतीच्या कामाला वेग आला आहे.यामुळेच आपल्या जवळ असलेली बैलाची जोडी घेवून शेतात उखळणी सुरु झाली आहे.

दर वर्षी पाऊस नियोजित वेळेवर पडत असतो.मात्र शेतात राब पेरणेर केल्यानंतर पाऊस मौन रुप धारण केल्यामुळे शेतातील राब करपून जात असतात.मात्र या वर्षी वरुन राज्यांन बळीराजावर चांगली कृपा दृष्टी ठेवावी असे साकडे बळीराजा वरुन राजाकडे करत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.