Press "Enter" to skip to content

सिंधुताईंच्या आवाहनाची कांजुरमार्गच्या संस्कृती प्रतिष्ठान (ट्रस्ट) कडून दखल

साद माईंची, साथ संस्कृतीची


सिटी बेल | मुंबई | पंकजकुमार पाटील |

सध्या चालू असलेल्या कोरोना आणि लॉक डाऊन च्या परिस्थितीमुळे आमच्या सर्व संस्थांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याठिकाणी संस्थेला धान्याची / किराणा वस्तूंची नितांत गरज आहे. त्यामुळे या संस्थांना शक्य होईल तेवढी मदत करण्यात यावी अशी विनंती अनाथांची माय पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी केली आहे . माईंनी केलेल्या आवाहनास साथ देऊन खारीचा वाटा म्हणून कांजुरमार्ग (पुर्व ) येथील संस्कृती प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने आश्रमास आवश्यक असलेले किराणा साहित्य जमा करून सुपूर्द करण्यात येणार आहेत.

रोख/धनादेश स्वरूपात मदत स्वीकारली जाणार नसल्याने इच्छुक व्यक्तींनी तूरडाळ , मुगडाळ , चना डाळ ,गोडेतेल, शेंगदाणे ,साखर , पोहे , रवा , कपड्याचा -आंघोळीचा साबण इत्यादी किराणा साहित्य प्रतिष्ठान कडे जमा करण्याबाबत कळविले आहे . किराणा साहित्य देणाऱ्या इच्छूकांनी या 7900122144 नंबरवर संपर्क साधावा.

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.