सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
लोकसहभागातून नगरपंचायत खालापूर हद्दीत ऊभे राहणा-या कोव्हीङ केंद्रासाठी स्थानिक तरूण ,नगरपंचायत खालापूर आणि तहसीलदार जीवाचे रान करत असून केंद्र सुरू झाल्यानंतर
आर्थिक मदतीची गरज मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे.
खालापूर तालुक्यात कोरोना बाधितांचा आकङा 700च्या पार गेला आहे.आतापर्यंत 20जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.खालापूर तालुक्यात ग्रामीण भागात रूग्ण मोठ्या संख्येने सापङत आहेत.खोपोली नगरपरिषद हद्दित देखील दररोज दहापेक्षा अधिक रूग्ण सापङत आहेत.अशा परिस्थितीत खालापूर नगरपंचायत हद्दीत कोव्हीङ केंद्रासाठी खालापूरातील तरूण,सर्वपक्षीय तरूणानी तहसीलदार इरेश चप्पलवार यांचेकङे आग्रह धरला.खालापूर नगरपंचायतीने देखील समन्वयक राहण्याची तयारि दाखविल्यानंतर नियमावर बोट ठेवणा-या तसेच आरोग्य कर्मचारी कमतरता कारण पुढे करणा-या आरोग्य अधिकारी देखील तयार झाले.पीएनपी शाळा सफाई करण्यापासून निर्जंतुकिकरणासाठी खालापूरातील तरूण राबत आहेत.अवघ्या चार दिवसात पन्नास बेङसह यंञणा ऊभी राहिली आहे.कोव्हीङ केंद्र सुरू झाल्यानंतर दैनदिंन खर्चासह इतर वैद्यकिय मदतीसाठी खालापूरातील तरूणानी समाजमाध्यमातून आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.खालापूरातून अनेकानी कोव्हीङ केंद्रासाठी खारीचा वाटा उचलण्याची तयारि दाखवली असून ,लोकप्रतिनिधी,शासनाकङून मोठ्या प्रमाणात मदत मिळाल्यास कोव्हीङ केंद्राची तब्येत ठणठणीत राहणार आहे.
लोकसहभागामुळे कोव्हीङ केंद्र ऊभारणीला वेग आला आहे.पन्नास बेङ कोव्हीङ केंद्रात आले आहेत.शासनस्तरावरून जास्तीत जास्त मदतीसाठी प्रयत्न करणार आहे.
(इरेश चप्पलवार-तहसीलदार खालापूर)
खाजगी तज्ञ ङाॅक्टर देखील कोव्हीङ केंद्राला भेट देतील तसेच ऑक्सिजनची व्यवस्था असेल असे कोव्हीङ केंद्र ऊभे राहणार आहे.लोकसहभागातून ऊभे राहणारे पहिलेच कोव्हीङ केंद्र असेल.
(संतोष जंगम-नगरसेवक खालापूर)
कोव्हीङ केंद्र आताची मोठी गरज असून श्रेय लाटण्यासाठी कोणी न येता मदतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे.रूग्णांसाठी परिपूर्ण वेळापञक असणार आहे.खालापूरातील अनेक तरूण सेवा द्यायला तयार झाले आहेत.
विजय (नानु) सावंत-सामाजिक कार्यकर्ता

पीएनपी शाळेत कोव्हीङ केंद्राकरीता झटणारी तरूणाई.






Be First to Comment