थकबाकी न भरल्यास एम आय डी सी करणार पाणीपुरवठा बंद !
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी परिसरातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीची ओलख आहे.तर तालुक्यात सर्वाधिक जवलपास ५० हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत अशी ख्याती आहे.
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत वासांबे मोहोपाडा,नविन पोसरी,आली आंबिवली,खाने आंबिवली, शिवनगर,पानशिल, तळेगाव, तळेगाववाडी, गणेशनगर,रिस-२ (निवासी वसाहती),रिस-१,कालणवाडी, भटवाडी,रिसवाडी आदी गावांसह शिवनगरवाडी,शिंदीवाडी,मोहोपाडा वाडी,खोंडावाडी,पानशिलवाडी, तळेगाव आदीवासीवाडी आदी वाड्या येतात.ग्रामपंचायत हद्दीतील गावांना व वाड्यांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत आहे.परंतु गेल्या तीस वर्षांपासून वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून एमआयडीसीला पाणीकर तुटपुंज्या स्वरुपात भरला जात आहे.
दरम्यान ३१ मे अखेर वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडे पॅनल्टीसह पाणीपुरवठा कर ४९ कोटी ४२ लाख ८३ हजार २६१ रुपये इतकी झाली आहे.तर सध्या ग्रामपंचायतीला दरमहा ५ लाख ७४ हजार ११२ रुपये पाणीकर येत आहे.याबाबत एमआयडीसीचे डेप्युटी इंजिनिअर एमआरके राजू यांनी ग्रामपंचायत कमिटीला बोलावून टप्याटप्याने थकबाकी भरण्याची ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.दरमहा एम आयडीसीकडे ५ लाख ७४ हजार ११२ पाणीकर न भरल्यास पाणीकपात केली जाणार असल्याचे एम आरके राजू यांनी सांगितले.
याबाबत एमआयडीसीची वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडे ३१ मे २०२१ अखेरपर्यंत टॅबनिहाय पॅनल्टीसह असलेली गावनिहाय आकडेवारी
वासांबे मोहोपाडा-एकूण थकबाकी ७ कोटी ६७ लाख ८७ हजार ८६९, दरमहा येणारे पाणीकर १ लाख १३ हजार ९०४ रुपये
नविन पोसरी-एकूण थकबाकी १३ कोटी १९ लाख ५९ हजार ६९५,दरमहा येणारे पाणीकर १ लाख २ हजार ७६७ रुपये
खाने आंबिवली-एकूण थकबाकी ३ कोटी २६ लाख ५१ हजार ८२४ रुपये,दरमहा येणारे पाणीकर ७१ हजार ४३८ रुपये
रिस-(१)–एकूण थकबाकी ९ कोटी ४६ लाख ३६ हजार ७२८ रुपये,दरमहा येणारे पाणीकर १ लाख २७ हजार ८०५ रुपये
रिस(२)–एकूण थकबाकी १५ कोटी ८३ लाख ४७ हजार १४५ रुपये, दरमहा येणारे पाणीकर १ लाख ५८ हजार १९८ रुपये
दरम्यान रसायनी हा औद्योगिकीकरणाचे नटलेला भाग असून हद्दीत वाढणारी लोकसंख्या,वसाहती पाहता वासांबे मोहोपाडा हद्दीत भविष्यात पाणी समस्या गंभीर होणार असल्याचे एम आयडीसी एमआरके राजू यांनी सांगितले आहे.वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीने काही अंश थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा बंद करणार असल्याचे एम आय डीसीचे डेप्युटी इंजिनिअर एम आर के राजू यांनी सांगितले.








Be First to Comment