सिटी बेल लाइव्ह / रायगड /अमूलकुमार जैन #
रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत जाणार्या कोरोना रोगाविरुद्ध लढण्यासाठी नांदगाव ग्रामपंचायतीतर्फे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थांना अर्सेनिक अॅल्बम 30 आयुर्वेदिक गोळ्या तसेच पिण्याच्या स्वच्छ व निर्जन्तुक पाण्यासाठी क्लोरिवॅट औषधाचे वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायतीचे कर्मचारी चंद्रकांत नांदगावकर, तुषार डवलेकर व नेहल पुलेकर यांनी गावातील सुमारे तेराशे (1300) घरोघरी जावून गोळ्यांबद्दल माहिती दिली.तसेच पाण्यात क्लोरिवॅट औषध मिसळून निर्जन्तुक केलेले पाणी पिण्यास वापरावे अशाच पाण्याने धुवून निर्जन्तुक केलेल्या भाज्या शिजवाव्यात अशा सूचना केल्या.
सरपंच वैशाली पवार, उपसरपंच अस्लम हलडे, ग्रामविकास अधिकारी जि.के.म्हात्रे आदी या वेळी उपस्थित होते






Be First to Comment