सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
श्रद्धा हॉटेल ते चारफाटा हा रस्त्या काहीं ना काही तांत्रिक कारणांमुळे अनेक महिने रखडलेला होता. एम एम आर डी ए च्या माध्यमातून 4 कोटी 95 लाख रुपये खर्च करून हा रस्ता होणार आहे. या एकाच रस्त्याला दोन नावाने मंजुरी मिळाल्याने हे काम रखडले होते. त्यांनतर हा रस्ता होण्यासाठी उपोषणे सुद्धा करण्यात आली होती. आज या रस्त्याचे भूमिपूजन झाल्याने खऱ्या अर्थाने या भागातील नागरिकांची चांगली सोय होणार आहे.
भिसेगाव मधील श्रद्धा हॉटेल नजीक भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते श्रद्धा हॉटेल ते चारफाटा रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, सभापती सुषमा ठाकरे, माजी उपसभापती मनोहर थोरवे, शिवसेना विधानसभा संघटक संतोष भोईर, उप जिल्हाप्रमुख भाई गायकर, पाणी पुरवठा समिती सभापती राहुल डाळिंबकर, भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, माजी तालुका प्रमुख संभाजी जगताप, सरपंच प्रमिला बोराडे, नगरसेवक नितीन सावंत, बळवंत घुमरे, संतोष भासे, नगरसेविका संचिता पाटील, विशाखा जिनगरे, प्राची डेरवणकर, स्वामीनी मांजरे, वैशाली मोरे, शिवराम बदे आदी उपस्थित होते.
माजी नगरसेविका यमुताई विचारे आणि शरद हजारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बाळाजी विचारे यांनी प्रस्तविकात ‘हा रस्ता व्हावा म्हणून आम्ही पाठपुरावा केला. केवळ एक कोटी साठ लाख रुपये खर्च करून हा रस्ता होणार होता परंतु भविष्याचा विचार करून एम एम आर डी ए च्या माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपये खर्च होणार आहे. पुढील पंचवीस वर्षे हा रस्ता टिकेल.’ असा विश्वास व्यक्त केला. राहुल डाळींबकर यांनी, ‘एखाद्या कामाचे श्रेय घेण्याचा अनेक जण प्रयत्न करीत असतात. परंतु ज्यांची सत्ता असते त्यांचाच आमदार भूमिपूजन आणि उदघाटन करतो. हा रस्ता चांगला व्हावा हीच आमची अपेक्षा आहे.’ असे स्पष्ट केले.

नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी, ‘या रस्त्याचे काम तांत्रिक अडचणींमुळे रखडल्याने या परिसरातील नागरिकांची खूप गैरसोय झाली. काहींना पाठीचा तर काहींना कंबर दुखीचा त्रास सहन करावा लागला. मात्र आता हा रस्ता मार्गी लागत असल्याने त्यांना त्रास होणार नाही. याचेच आम्हाला समाधान वाटते.’ असे स्पष्ट केले. आमदार महेंद्र थोरवे यांनी, ‘कर्जतचे ‘नंदनवन’ कसे होईल यासाठी आम्ही झटत आहोत. त्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
आतापर्यंत आपण सहकार्य करीत आलात म्हणून गेल्या दीड वर्षात मतदारसंघातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणता आला. उपोषण हे थोतांड होते. विरोधकांकडे लक्ष न देता आपण आपले काम करीत राहू या.’ असे सांगितले. सूत्रसंचालन अभिषेक सुर्वे यांनी केले.








Be First to Comment