Press "Enter" to skip to content

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अदिवासी महिलांना फळ झाडे वाटप

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

आज जागतिक पर्यावरण दिनांच्या निमित्ताने अनेक झाडे लागवड केली जाते.वृक्ष लागवड आणी संवर्धन ही आताच्या काळाची गरज आहे.मात्र वृक्ष लागवड केली पाहिजे.या उद्देशाने सेवा सोशल सर्विस सोसायटी माध्यमातून अदिवासी महिला वर्गांना पाचशेहून अधिक फळ झाडे वाटप करण्यात आली.

या मध्ये प्रामूख्याने आंबा, कलम,लिंबू ,काजू, चिकू, सीताफळ, जांभूळ अदि फळ झाडे वाटप करण्यात आली.यातून पर्यावरणाचा समतोल आबाधित राहणार असून,अदिवासी महिला वर्गांस ह्या वृक्षांना फळे आल्यास त्यापासून रोजगार मिळणार आहे.या विचारांतून हा कार्यक्रम या दिवशी हाती घेण्यात आला.

वृक्ष म्हणजे जणू मानवांचे फुफ्फुस आज पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असतांना आज वृक्ष लागवड आपल्यांसाठी अतिषय महत्त्वाचा भाग झाला आहे.आपणांस शुद्ध हवा,सावली त्यांस समवेत.त्या पासून फळे अदि वस्तू आपणांस मिळत असतात.मात्र गेल्या काही वर्षात विविध कारणांमुळे वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात होत आहे.मात्र आपण मोकळ्या जागेवर वृक्ष लागवड आणी संवर्धन हा कार्यक्रम हाती घेतल्यास येणाऱ्या काही वर्षात निसर्गाचे सौंदर्य आपणांस जवळून पाहता येइल

आज जागतिक पर्यावरण दिन असल्यामुळे ह्या झाडाचे वाटप केल्यामुळे ह्या महिलावर्ग त्यांना निच्छितच मोठे करुन त्या पासून त्यांस उत्पन्न मिळणार आहे या सर्व बाबीचा विचार करुन सेवा सोशल सर्विस यांच्या माध्यमातून खरसुंडी येथिल असलेल्या सेंट मेरी स्कूल येथे हा कार्यक्रम हाती घेण्यात आला.यावेळी सेवा सोशल सर्विस सोसायटी व करितास इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सेंट मेरी स्कूल (खरसुंडी) येथे लिजॉय जोसेफ,फादर सानू सॅम, प्रकल्प समन्वयक- मंगेश भंडारे, सहकारी जगदीश चाळके, कांचन सावंत, वासंती धांदृत आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.