Press "Enter" to skip to content

वृक्ष असती वसुंधरेचे जीवन,वृक्ष लावून करा तिचे रक्षण : शर्वरी कांबळे

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

ऑक्सिजनचे महत्व आपण शाळेत विज्ञानात शिकलो पण त्याचे खरे महत्व आज आपल्याला कोरोनाने शिकवले. निसर्गाने हाच ऑक्सिजन आपल्याला मुक्त हस्ते विना मोबदला दिला आहे. पण आपल्याला त्याची किंमत नव्हती. आज कोरोनामुळे ती आपल्याला कळली आहे. असे प्रतिपादन कर्जत शहर भारतीय जनता पक्ष उपाध्यक्ष शर्वरी संतोष कांबळे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केले.

वाढदिवसाचे निमित्त साधून उल्हास नदीकिनारी उल्हास नदी निर्मल जल अभियानाचे कार्यकर्ते समीर सोहोनी व मुकुंद भागवत यांचे सहकार्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर,कर्जत नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे,कर्जत शहर अध्यक्ष,नगरसेवक बळवंत घुमरे,रायगड जिल्हा महिलाआघाडी चिटणीस बिनीता घुमरे, नगरसेविका स्वामिनी मांजरे,नगरसेविका विशाखा जिनगारे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे,महिला आघाडी शहर अध्यक्ष सरस्वती चौधरी,उद्योग आघाडी प्रमुख मंदार मेहेंदळे, दिनेश सोलंकी, सूर्यकांत गुप्ता, विजय जिनगारे ,युवा मोर्चा पदाधिकारी किरण ठाकरे,अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख बिलाल आढाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.