Press "Enter" to skip to content

वानिवली येथिल स्मशानभूमीच्या जागेचे भूमिपूजन

सरपंच पल्लवी देवघरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केले पुजन



सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

मानवी मृत्यूनंतरचे चिरंस्थान म्हणजे स्मशानभूमी मात्र,गेल्या काही वर्षामध्ये वानिवली गावातील असलेली स्मशान भुमिची दुरवस्था निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी नविन स्मशानभूमी बांधण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला.यामुळे आज शासनांने दिलेल्या नियमाचे पालन करुन या नविन स्मशानभूमी बांधण्याच्या जागेच्या भूमिपूजन सोहळा ग्रूप ग्राप पंचायत इसांबे पल्लवी विकास देवघरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

गाव तिथे स्मशान भुमी असतेच,मात्र या स्मशानभूमीची दुरवस्था झाल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यास खूप समस्या निर्माण होत होत्या.मात्र तसे होवू नये,यासाठी ग्रामपंचायतीने आर.सी.सी स्मशानभूमी बांधण्याचा निर्णय घेतला.यामुळे ग्रामपंचायतीचे सदस्य,सरपंच,तसेच ग्रामस्थ या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित होते.

या ठिकाणी उत्तम अशी स्मशानभुमी बाधण्यात येत असल्यामुळे मृत्यूनंतर त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यात कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.असे मत भूमीपूजन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

यावेळी सरपंच – पल्लवी विकास देवघरे,उप सरपंच – अनंता पाटील, सदस्य,मधुकर शिनगारे,नामदेव तारु,सदस्या श्रद्धा मुसळे,रेश्मा पाटील,हेमलता देवघरे,ताई हिलम,ग्रामसेवक – विजय नलावडे, पोलीस पाटील – मारुती थोरवे,ग्रामस्थ – रमेश मुसळे,मनोज थोरवे,विकास देवघरे,समिर देवघरे,भगवान पवार, सोपान पवार,देवेंद्र पवार,यशवंत थोरवे,प्रकाश थोरवे,मंगेश तारु,राजेंद्र थोरवे,अदि उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.