दांड फाटा येथील घटना
सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |
हॉटेलमध्ये बसून बिअर पिण्यास नकार दिल्यामुळे हॉटेलचा मॅनेजर अनिल भंडारी याला विशाल गोपाळ पाटील( वय .25 .भोकरपाडा )याने मारहाण केल्याची घटना खालापूरात घडली. याबाबत विशाल पाटील विरोधात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे .
सरोवर हॉटेल दांडफाटा खालापूर बाजुला असेलेली बियर शॉपीचे इलेक्ट्रीक काम अनिल भंडारी करून घेत असताना विशाल याने येवुन अनिल यांचेकडे बियर मागीतली .मला हॉटेलमध्ये बसुन प्यायची आहे असे
विशालने सांगीतले. त्यावेळस अनिल यांनी बियर शॉपी बंद आहे तुला जेवण पार्सल पाहीजे असेल तर घेवुन जा तुला येथे बसता येणार नाही असे सांगीतले. त्याचा राग येवुन विशालने शिवीगाळी करून अनिलच्या कानाखाली मारली. चेह-यावर हाताबुक्क्यांनी मारून ओरबडले व हॉटेलच्या गेट बाहेर घेवुन जावुन अनिल ला खाली जमीनीवर आपटले. तसेच कंबरेवर व उजव्या पायावर लाकडी दांडक्याच्या उपटी मारून दमदाटी केली.
याबाबत रसायनी पोलीस ठाणे येथे विशाल पाटील विरोधात भा.दं.वि.कलम 324,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि.पवार हे करित आहेत.







Be First to Comment