वाळू तस्करी मुळे बहुतांश जमिनीचा भाग पाण्याखाली, ग्रामस्थांनी केला संताप व्यक्त
सिटी बेल । रोहा । अमूलकुमार जैन ।
रोहा तालुक्यातील न्हावे, नवखार , सोनखार गावाजवळील कुंडलीका खाडीच्या मुखावर दोन्ही बाजूच्या मॅगरेज ( तिवर ) ची कत्तल करून किनाऱ्यापासून आत मध्ये खोदकाम करून सेक्शन पंपाद्वारे अनधिकृत उत्खल्लन गोपण, दिवि पारंगी, दिव, रेवदंडा येथून घेऊन केली जाते.
गावातील मच्छिमार बांधव आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी जवळजवळ शंभर ते दीडशे जण मासेमारी करतात. खाडीतून जाण्याचा मार्गावर मोठे मोठे ढिगारे केल्यामुळे छोटे मासेमारी करणारे व्यवसायकांचे नुसकान होत आहे. त्यात त्यांची जाळी तुटणे हे प्रकार होत असतात. त्यामुळे त्यांचे धंदे बंद होऊन उपासमारीची वेळ आली आहे.
आपल्या भागात खरचं वाळू उत्खल्लन होत आहे हे पाहण्यासाठी गावातील उपसरपंच गैणीनाथ कटोरे , तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रेय भायतांडेल , पोलीस पाटील मंगेश पाटील , विनायक कटोरे शंकर शाबासकर ,कमलाकर डबीर , सदानंद पाटील ,मोहन न्हावकर अन्य प्रतिष्ठित ग्रामस्थ स्वतः जाऊन पाहणी केली असता हे सर्व दृश्य पहावयास मिळाले. खाडी पासच्या गावाला धोका निर्माण होत असताना प्रशासन अजुनही उदासिन असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तरी प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.








Be First to Comment