Press "Enter" to skip to content

चावणे जवळ पुलावर तोल गेल्याने पाण्यात पडून तरुणाचा मृत्यू

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

परसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडिसी हद्दीतील मौजे चावणे गावच्या हद्दीत चावणे पुलाजवळ ,अक्षर डेव्हलपर्सच्या मागील बाजूस पुलावरून चालत असताना तोल गेल्याने पाताळगंगा नदीमध्ये पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.प्रसन्न एकनाथ पवार वय २५ वर्षे रा.कणकवली जि.सिंधूदुर्ग सध्या रा.नेरुळ- नवी मुंबई हे चावणे पुलावरुन चालत असताना त्याचा तोल जावून तो पाताळगंगा नदीत पडून पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून मयत झाला.

या बाबत रसायनी पोलिस ठाणे येथे आकस्मित मृत्यूची सी.आर.पी.सी १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून या घटनेची माहिती मिळताच वारिष्ठ पोलिस निरिक्षक सुजाता तानवडे यांनी घटनास्थळी भेट दिली.याबाबत सपोनि मुल्ला नेमणूक रसायनी पोलीस ठाणे तपासिक अंमलदार -सहा .फौज .डोके या घटनेचा पुढील तपास करत आहेत.या मृत तरुणाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी कांबे येथील तरुणांच्याटिमने सहकार्य केल्याचे समजते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.