Press "Enter" to skip to content

कार इन्सुरंस नो ड्राईव्ह बेनिफिट द्यावा उदय पाटील यांची मागणी

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक गाडीचा विमा असावा असा परिवहन खात्याचा कायदा आहे. ट्रॅफीक पोलिसांनी गाडी अडवल्या नंतर सर्वात आधी चालकाचे लायसन्स आणि विम्याची कागदपत्रे मागतात.विमा भरला नसेल तर जबर दंडाची तरतूद असल्याने सर्व वाहन धारकांना तो काढवाच लागतो. दुर्दैवाने अपघातात मोठे नुकसान झाले तर विमा कंपनी भरपाई देईल या करिता वाहन मालक स्वेच्छेने तो काढतातच. मागील दोन वर्षात कोरोना महामारी मुळे बराच काळ रस्त्यावर फिरायला किंवा वाहने चालवायला शासनाने बंदी घातली होती.त्यामुळे वाहने रस्त्यावर फिरकली नाहीत.परिणामी अपघातांचे प्रमाण नगण्य होते.अपघात नसल्याने विमा कंपनीने भरपाई देण्याची वेळ कवचितच आली.त्यामुळे मागील दोन वर्षात वाहन विमा कंपन्यानी मोठ्या प्रमाणात नफा कामविला आहे. एखाद्या वाहनाने वर्षभरात अपघात केला नाही किंवा काही क्लेम मागितला नाही तर विमा नूतनीकरण करताना 20% नोक्लेम बोनस मिळतो. परंतु चार महिने गाड्या चालवल्याच गेल्या नसल्याने विमा कंपन्यांनी 20% नोक्लेम बोनस सोबत, 40% नो ड्राईव्ह बोनस सुद्धा द्यावा.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत सर्व विमा कंपन्यांना आदेश द्यावेत अशी मागणी कर्जत मधील सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.