Press "Enter" to skip to content

रोहा तालुक्यातील नामवंत रस्ता गेली अनेक वर्षे डांबराच्या प्रतीक्षेत

डांबर टाकण्यावर कुठे माशी शिंखली, नागरिकांचा संतप्त सवाल

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

रोहा तालुक्यातील गेली अनेक वर्षे रखडलेला व चर्चेचा बनलेला विषय तो म्हणजे खांब देवकान्हे पालदाड मार्ग सदरच्या मार्गावरील चिल्हे ते देवकान्हे हा मार्ग गेली अनेक वर्षे डांबराच्या प्रतीक्षेत आहे तर मार्गावर असलेले साकव देखील जीर्ण झाले असून केव्हाही कोसळू शकतात त्याच बरोबर याची तालुकास्तरावरील रस्त्यांमध्ये अरुंद मार्ग म्हणून गणती असेल यात शंका नाही.

येथील ग्रामस्थांनी आवाज उठविला की संबधित ठेकेदार येतो थातूर मातूर डागडुजी करतो बिलाचे पैसे लाटतो आणि निघून जातो परंतु ठोस उपाय योजना का होत नाही ? याबाबत कित्येकदा या रस्त्याची दुरुस्ती अथवा हा रस्ता मार्ग दुरुस्तीसाठी येथील नागरिकांनी मागणी केली अनेक आपघात या मार्गावर घडले कित्येकजण गंभीर जखमी देखील झाले आहेत मात्र रस्ता होणार हे केवळ आश्वासन मग गेली अनेक वर्षे डांबर टाकण्यास कुठे माशी शिंखते याचा आजतागायत येथील नागरिकांना उलगडा झाला नाही .

खड्यांचा खड्डेमय प्रवास कधी थांबणार या मार्गावर तीन चार वर्षपूर्वी निडीतर्फे अष्टमी ते देवकान्हे खांब मार्गाचे दुरुस्तीचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत करण्यात आले तर देवकान्हे ते चिल्हे या रस्त्यावर पडणारी डांबर गेली कुठे ,रस्ता होणार मग कुठे माशी शिंखली ,असा संतप्त सवाल येथील नागरिक करत आहेत .

रोहा तालुक्यातील नामवंत अशी नावलौकिक असलेले सडक म्हणजे खांब देवकान्हे पालदाड सडक सदरच्या सडकेवरील चिल्हे ते देवकान्हे या सडकेची दुरुस्ती अथवा डांबर टाकण्यास कोणता मुहूर्त लागेल रस्ता दुरुस्ती केली जाईल याला आजपर्यंत किती पावसाळे गेले याचा पत्ता नाही तीन चार वर्षपूर्वी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या अथक प्रयत्नातून निडीतर्फे अष्टमी ते देवकान्हे मार्गाचे काम भाजप शिवसेना सरकारच्या काळात करण्यात आले तर देवकान्हे ते चिल्हे हा दोन की मी अंतरचे काम आजतागायत रखडले आहे अत्यन्त दयनीय अवस्था या मार्गाची झाली असून अरुंद मार्ग असल्याने आपघाचे धोके देखील वाढले आहे सडकेची दुरुस्ती करणे गरजेचे आहे तर मार्गलगतचे शेतकरी अधिक अतिक्रमण करत सदरच्या मार्गावर कुंपण घालत असल्याने मार्ग प्रवास अधिक धोकादायक ठरत असल्याचे बोलले जात आहे.

गेली अनेक वर्षे खांब देवकान्हे पालदाड मार्गाचे काम रखडले आहे त्यात चिल्हे धानकान्हे देवकान्हे हा मार्ग अत्यन्त धोकादायक झाला आहे गेली वर्षभरात अनेक आपघात झाले आहेत एकेरी मार्ग असल्याने दुसऱ्या वाहन चालकाला मोठी तारेवरची कसरत करून वाहन पास करावी लागत आहे तर भले मोठे पडलेले खड्डे प्रवासी नागरिकांच्या जीवावर वेतले आहेत या मार्गावरून येथील ग्रामस्थ नागरिक रोजंदारी करता धाटाव औद्योगिक क्षेत्रात तर काही विविध ठिकाणी जा ये करत असतात मात्र धोकादायक मार्ग त्यांची डोकेदुखी ठरत आहे तरी संबधित अधिकारी वर्गाने लक्ष केंद्रित करून पवसाळ्यापूर्वी या मार्गाची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे  

आदिवासी महिला सामाजिक कार्यकर्त्या गुलाबताई वाघमारे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.