Press "Enter" to skip to content

ब्राह्मण सभेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर निबंध स्पर्धा संपन्न

ब्राह्मण सभेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर निबंध स्पर्धा संपन्न

श्रीनिवास काजरेकर
नवीन पनवेल दि. २९ः
ब्राह्मण सभा, नवीन पनवेल या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. “मला उमलेले सावरकर” या विषयावर आधारीत स्पर्धेमधे पनवेल परिसरातील स्पर्धकानी सहभाग घेतला. १८ वर्षाखालील व १८ वर्षावरील अशा वयोगटात ही स्पर्धा ऑनलाईन स्वरुपात संपन्न झाली. प्रसिद्ध लेखिका निलिमा देशपांडे व अपर्णा साठे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. संभेच्या अध्यक्षा दिपाली जोशी, सचीव मंजुषा भावे, खजिनदार वैशाली सरदेशपांडे, सदस्य शेखर अंबेकर व मिलिन्द गांगल यांनी स्पर्धा संपन्न करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
लहान गटामधे मयुरी जोशी हिने प्रथम, आर्या सहस्रबुद्धे द्वितीय, हर्षद कार्ले व आयुष सोमण तृतीय आणि वेधस अत्रे व सान्वी अंबेकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. खुल्या गटामधे अनुराधा ओगले व पद्मनाभ भागवत यांनी प्रथम, संगीता जोशी व स्वप्ना पेंढारकर यांनी द्वितीय, श्रीनिवास काजरेकर यांनी तृतीय क्र. प्राप्त केला तर शंकर आपटे, शुभांगी क्षीरसागर व ओंकार लेले यानी उत्तेजनार्थ क्र. प्राप्त केला.
सहभागी स्पर्धकानी वीर सावरकरांच्या कार्याचे विविध पैलू निबंधरूपाने हस्तलिखित स्वरुपात सादर केले. त्यांची देशभक्ती, क्रांतिकार्य, काव्य, नाटक, लेख, कादंबरी आदी स्वरूपातील साहित्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, समाजसुधारणेचे कार्य आदी विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण निबंध स्पर्धकानी सादर केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.