सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।
सावरोली – खारपाडा या रस्त्याचे दोन वर्षापुर्वी झाले.मात्र दर वर्षी पावसाळ्यात रस्ते खचण्याचे ग्रहण लागत आहे. आंबिवली येथिल असलेल्या ब्रीज च्या खाली असलेल्या मोरीच्या ठिकाणी खड्डा पडला असून रात्रीच्या वेळी निदर्शनास न आल्यास अपघाताची समस्या गंभीर होवू शकते.मे महिन्यामध्ये आलेल्या वादळी पाऊस मुळे या रस्त्याला ग्रहण लागले असून तातडीने यांची डागडुजी करण्यात यावी अशि संतप्त प्रतिक्रिया या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक व्यक्त करीत आहे.
या रस्त्यालगत शेती असल्यामुळे शेतकरी भात लागवड करीत आहे.पाणी एका ठिकाणी जमा होवू नये यासाठी पुर्वी काही ठिकाणी मो-या होत्या यामुळे काही ठिकाणी मो-या बसविण्यात आल्या.मात्र दर वर्षी पडत असलेल्या पावसामुळे येथिल मो-या च्या ठिकाणी असलेली माती वाहून जावून या ठिकाणी भाग कमकुवत होत असल्यामुळे परिणामी येथिल भाग खचत चालले आहे.पावसाळ्या पुर्वी ज्या ठिकाणी मो-या बसविण्यात आल्या आहेत त्यांची डागडुजी करणे अत्यंत महत्वाचे असून नाहीतर पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होवू शकते.
या मार्गावर विविध कारखाने असून या ठिकाणी सातत्याने रेलचेल असते यामुळे आश्या ठिकाणी खचलेल्या भाग निदर्शनास किंवा पडलेला खड्डा निदर्शनास न आल्यास मोठे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.सदर अपघात रात्रीच्या वेळी होण्याची समस्या गंभीर असून रात्रीच्या वेळी हे खचलेले भाग निदर्शनास येत नाही यामुळे अपघात घडू शकतो.यामुळे या मार्गावरील असलेल्या मो-या किंवा ज्या ठिकाणी खचलेला रस्ताचे काम लवकरात – लवकर करावे अशी मागणी प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.








Be First to Comment