Press "Enter" to skip to content

खोपोली नगरपरिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी पदी सुरेखा भणगे यांची नियुक्ती

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)

कोरोनाच्या महामारीत अधिकारी हि सुटले नसून  कोरोनाच्या विळख्यात सापङले आहेत खोपोलीत देखील अशीच परिस्थिती ओढावल्याने 

 खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांची नगरपरिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली  आहे.खालापूर तालुक्यातीत विशेषतः खोपोली शहरातील वाढती रूग्णसंख्येवर नियंञण मिळविणे अवघङ जात आहे. खालापूर नगरपंचायतीचा प्रशासकीय कारभार मुख्याधिकारी सुरेख भणगे चांगल्या पध्दतीने सांभाळत असून  कोरोना महामारीत रात्रंदिवस काम करीत आहेत.खालापूर शहरात सर्व शासकिये कार्यालये असताना देखील कोरोनाचा प्रसार आटोक्यात ठेवण्यात मुख्याधिकारी सुरेखा भणगे आणि नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा शिवानी जंगम यांची मेहनत दिसून येत आहे. खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे रजेवर असल्याने रायगङ जिल्हाधिकारी यानी सुरेखा भणगे यांचेकङे प्रभारी जबाबदारी सोपवली आहे.

             

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.