Press "Enter" to skip to content

कळंब मधील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश

जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांच्या हस्ते स्वागत

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत तालुक्यातील कळंब येथील ग्रामस्थांनी आज राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश केला, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांनी सर्वांचे स्वागत केले.

कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर दहिवली येथील राष्ट्रवादी भवन येथे छोट्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कळंब जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष नामदेव बदे, युवक तालुका अध्यक्ष सागर शेळके, युवक तालुका उपाध्यक्ष शाहनवाज पानसरे, विनोद मोरे, शकील डोंगरे, अरुण बदे, सुनिल मोरगे हे उपस्थित होते.

कळंब ग्रामपंचायत माजी सरपंच फाईक खान, उपसरपंच राहुल परदेशी, शाहिद मस्ते, नदीम मस्ते, साहिर लोगडे, आकीब पानसरे यांनी शेतकरी कामगार पक्षाचा त्याग करून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला, जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांनी त्यांचे स्वागत केले.

सुरेश लाड आपल्या मार्गदर्शनात म्हणाले आपल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस कडे वेगळ्या दृष्टिकोन तुन पाहिलं जातंय, शरद पवार साहेबांवर महाराष्ट्रातला तरुण वर्ग प्रेम करतो.पवार साहेबांच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात चित्र बदलून गेले, मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार असं म्हणणाऱ्यांना सुद्धा घरी बसविण्याचे काम पवार साहेबांनी केलं. आपलं भाग्य आहे की शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.तालुक्यांमध्ये कार्यकर्त्यांची संघटना उभी करत असताना विकास कामाच्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे, मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे, आपला उद्योग, व्यवसाय असल्यामुळे जनसंपर्काचे काम करू शकतोय, आदिवासी किंवा बहुजन समाजाला पुन्हा आपल्याकडे वळवण्याचे काम आपण करावे. तुमच्या ग्रामपंचायतीला अजुन भरपुर वेळ आहे परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, कोणाबरोबर युती , आघाडी होईल हे आता सांगू शकत नाही, आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे या उद्देशाने आपण तयारी करावी, आपल्या विभागात एक जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समितीच्या जागा जिंकणे हे गरजेचे आहे त्या दृष्टीने आपण आजच्या सुमुहूर्तावर निर्णय घेऊ या आणि त्या कामाला लागावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो, पुन्हा एकदा तुमचं मनापासून पक्षांमध्ये स्वागत करतो आपल्या पक्ष्यांमध्ये आल्यानंतर तुम्हाला आनंद होईल अशा प्रकारचे वातावरण पक्षांमध्ये राहील,काम करणाऱ्याला सन्मानाचं पद ही दिले जाईल अश्या भावना व्यक्त करून आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो असे सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.