Press "Enter" to skip to content

खालापूरात शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरूवात

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।

येणार्‍या काही दिवसामध्ये पावसास सुरूवात होणार असून त्यासाठी पावसाळी हंगामातील पिकांच्या तयारीसाठी शेतकर्‍याकडून खालापूर तालुक्यात शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असल्याने नांगरणी, कोळपणीसह अन्य कामांची शेतकर्‍यांकडून जय्यत तयारी सुरू आहे. गेल्या वर्षी बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला होता. त्यामुळे यंदा काय होणार याची सर्वांना आस लागली आहे.

गेल्या वर्षी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने याचा मोठा परिणाम शेती व इतर व्यवसायावर मोठ्या प्रमाणात झाल्याचा दिसून आला होता. त्यामुळे काही ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे शेतीसाठी बी-बियाणे, औषधे, खते, मेहनत यावर मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचा खर्च झाला होता. पाऊस अती पडल्याने जोमात आलेली पिकांची नासधूस झाल्याने झालेला एवढा मोठा खर्च शेतकऱ्यांचा वाया गेला, त्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात गेल्या वर्षी सापडला होता. मात्र आता काही दिवसांवर या वर्षीचा पाऊस येवून ठेपलेला आहे.

काही दिवसातच या पावसास सुरूवात होणार असून या हंगामाच्या पिकाच्या तयारीसाठी शेतांची नांगरणी खुरपणी, बांधावरील गवत पेटवणे, शेणखत शेतात पसरवणे, जमिन भुसभुशीत करणे या अशी विविध कामे सुरू आहेत. तर पावसाच्या तोंडावर शेतकर्‍यांच्या शेतीची मशागत करण्यामध्ये वेग वाढला आहे. गेल्या हंगामात पावसाने काही ठिकाणी मोठी हजेरी लावली होती. यंदा येणाऱ्या पाऊसाचे रुप कसे असणार ? याकडे सर्व शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.