Press "Enter" to skip to content

आई फाऊंडेशन धावून आली दिव्यांगाच्या मदतीला

सिटी बेल । रायगड । अमूलकुमार जैन ।

कोरोनाने विषाणूने रायगड जिल्हा सहित सर्वत्र हाहाकार माजविला तज्ञ त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांवर उपासमारीची वेळ येऊ लागली.अशी वेळ दिव्यांग बांधावावर येऊ नये म्हणून त्यांच्या मदतीला धावून आली ती दिव्यांग कर्मचारी संघटनाआणि आई फाऊंडेशन.

कोरोना या विषाणूंमुळे भारतासहित जगात लाखोंच्या संख्येत बळी घेतले आहे.त्यामुळे प्रशासनाने कोरोना या विषाणूची वाढती साखळी तोडण्यासाठी साठी मार्च पासून वेळोवेळी संचारबंदी लागू केली. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडू लागल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.त्यामुळे सदृढ व्यक्ती हतबल झाले त्याच्यापुढे दिव्यांग काय करणार.त्यांनी एकतर भीक मागावी अन्यथा आत्महत्या करावी हे दोन पर्याय समोर होते.मात्र दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी दिव्यांग संघटना सहित आई फाउंडेशन ही धावून आली.आणि त्यांनी जिल्ह्यातील जवळपास पाच हजार सहाशेहून अधिक गरजू दिव्यांग बांधवांना, निराधार विधवा महिलांसाठी तसेच मोल मजूरी करणारे कामगार यांना जीवनांवश्यक साहित्याचे वाटप केले.त्याचबरोबर त्यांना मास्क, स्टॅनीलायझर यांचे सुद्धा वाटप करण्यात आले.

आई फाऊंडेशन चे अध्यक्ष राजू साळूंके, उपाध्यक्ष सागर पवार,अमुलकुमार भलगट, अपंग संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार यांचे सगळ्याकडून कौतुक होत आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.