Press "Enter" to skip to content

अविनाश पडवल यांच्याकडून कोविड सेंटरला कपाट भेट

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

सध्या संपुर्ण देशात, राज्यात व ग्रामीण भागात कोरोना महामारीचे महाभयंकर संकट ओढावले आहे, गेल्या वर्षंभरात अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले.त्यातच सागरी वादळामुळे न भुतो न भविष्यती अशा स्वरुपाची प्रचंड आर्थिक व नैसर्गिक हानी होऊन जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले आहे. लहानथोरांना काही सुचेनासे झाले आहे.

शासन आपल्या परीने नागरीकांमध्ये जनजागृती करून अथक उपाययोजना करत आहे.नागरीकही आपापल्या परीने काळजी घेण्याचा प्रयत्न करुन कोरोनाशी चार हात दुर राहुन आपला जीव वाचवून प्रपंचाचा गाडा हाकत आहे.लाॅकडाऊन कालात गरजू गोरगरीबांना काहीअंश दिलासा मिळावा यासाठी रसायनी वृंदावन येथील मनसे तालुकाध्यक्ष अविनाश नारायण पडवल यांच्याकडून गरजूंना जिवनावश्यक वस्तूंसह आदीवासीना भाजीपाला, मास्क, सॅनिटायझर तसेच विविध वस्तूंचे वाटप होत आहे.मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अविनाश पडवल यांच्याकडून कलंबोली कोविड सेंटरला डाॅक्टरांना वैद्यकीय साधने ठेवण्यासाठी दोन कपाट भेट म्हणून देण्यात आले.

यावेळी जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील, उपजिल्हाध्य‌क्ष अतुल चव्हाण,पराग बालड,अमोल बोचरे, जेष्ठ सैनिक संजय मुरकुटे,अवधूत ठाकूर, संचित मोरे, आकाश दलाल,अक्षय जोशी,सिध्देश खानविलकर आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.