Press "Enter" to skip to content

कानसा वारणा फाऊंडेशनच्यावतीने रोगप्रतिकारकशक्ती वाढविणा-या टॕबलेट, सॅनीटायझर,मास्क वाटप !

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

मागील वर्षभरापासून देशात कोरोना महामारीने भीषण थैमान घातले आहे. मध्यंतरी कोरोना महामारीचे प्रमाण कमी झाले होते परंतु पुन्हा कोरोना महामारीचा कोविड टु डबल म्युटेशन नावाचा नवीन ट्रेंड आल्याने पुर्वीपेक्षा अधिक नागरिक बाधित होत असून अनेक नागरिकांना जीव गमवावा लागत आहे.‌ राज्यात कोरोना महामारीचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. सद्या कोरोना महामारीचे भीषण संकट ओढावले आहे आणि त्यातच वातावरणातील बदलामुळे नागरिकांना छोट्या छोट्या आजारांसाठी देखील दवाखान्यात जावे लागते. त्यामुळे कोरोना सारख्या महामारीमुळे गरजू गोरगरीबांना काहीअंश दिलासा मिळावा यासाठी कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक चौक वावर्ले येथील दिपकदादा गणपत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी गरजूंना जिवनावश्यक वस्तूंसह, आर्सेनिक अल्बम टॅबलेट, मास्क व सॅनिटायझरचे वाटप सुरू आहे.

कोरोना संकटाचे गांभीर्य ओळखून कानसा वारणा फाऊंडेशनचे संस्थापक दिपक दादा गणपत पाटील यांच्या नेतृत्वाखालील अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी विरळे पळसवडे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावात अर्सेंनिक अल्बम रोगप्रतिकारक शक्ती टॕबलेट बोटल , तसेच विरळे बौद्धवाडी मध्ये सॅनीटायझर व मास्क वाटप केले. यावेळी अध्यक्ष कृष्णा पाटील, यूवा अध्यक्ष महेंद्र पाटिल, दिपकृष्ण नागरी पतसंस्था मॅनेजर तानाजी पाटील,नवी मुंबई यूवा अध्यक्ष अमोल आसूलकर,अनिल पाटील पांडूरंग पाटिल,गणपत केरू पाटिल ,इंजिनिअर संदिप पाटिल, सूरज सावंत ,तूकाराम पाटील आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.