Press "Enter" to skip to content

माडभुवन वाडीत जलजीवन योजना राबविण्याचे ज्ञानेश्वर घरत यांचे प्रयत्न

सिटी बेल । तळोजा । प्रतिनिधी । 

पनवेल तालुक्यातील आपटे ग्रामपंचायत हद्दीतील माडभुवन वाडीत जलजीवन योजना राबविण्याचे प्रयत्न असून  ही वाडी पाणी टंचाई मुक्ती बरोबर टँकर मुक्त होईल असा आत्मविश्वास रायगड जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी व्यक्त केला.

माडभुवन येथे जलजीवन योजना राबविण्यात यावी अशी मागणी सरपंच निकीता भोईर यांनी कार्यकारी अभियंता  पाणीपुरवठा विभाग अलिबाग यांच्यकडे लेखी निवेदनाने केली आहे. यासाठी पाणी पुरवठा अधिकारी  दिपकनाथ राणे पाणी टंचाई दुर्गम वाड्यात पाणी पुरवठा व्हावा म्हणून खुप मेहनत घेत आहेत.  

सध्या राज्यात केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने जल जीवन मिशन कार्यक्रम सन २०२०-२०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे . या कार्यक्रमांतर्गत ” हर घर नल से जल ” या उद्देशाने ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना वैयक्तिक कार्यात्मक नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो . या कार्यक्रमाच्या उद्देशानुसार राज्यातील ग्रामीण भागात नळ पाणी पुरवठा योजनेची कामे हाती घेण्यात आली आहेत

 राज्यातील अनेक गावे, वाड्या , दुर्गम डोंगराळ भाग , आदिवासी क्षेत्र हे उन्हाळ्यात पाण्याचा ताण असलेल्या क्षेत्रात असल्यामुळे या गावांमध्ये कार्यात्मक कुटुंब नळ जोडणी द्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी पर्यायी उपाय योजनांची आवश्यकता आहे . राज्यामध्ये सन २००२ ते २०० ९ या कालावधीत शिवकालीन पाणी साठवण योजना राबविण्यात आली आहे . या योजनेंतर्गत उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या असलेल्या गावांमध्ये पावसाचे पाणी साठवणूक करण्याच्या व स्रोत बळकटीकरणाच्या योजना हाती घेण्यात आल्या होत्या . या योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांद्वारे अनेक गावांच्या उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्या यशस्वीपणे सोडविण्यात आल्या आहेत . याच धर्तीवर केंद्र शासनाद्वारे इतर राज्यात देखील स्रोत बळकटीकरणाच्या योजना हाती घेण्यास प्रोत्साहन दिले आहे . राज्याची विशिष्ट भौगोलिक व भुस्तरीय रचना तसेच पर्जन्यमानात असलेली मोठी तफावत या बाबींमुळे राज्याचे सुमारे ४२.५ टक्के क्षेत्र ( १७३ तालुके ) हे अवर्षण प्रवण क्षेत्र आहे . राज्याची भुस्तरीय रचना ( Geology ) , भौगोलिक परिस्थिती व भुपृष्ठीय पाण्याचे स्रोत यामुळे ग्रामीण भागातील सुमारे ८० % पेक्षा अधिक योजना दरवर्षी पुनर्भरीत होणाऱ्या भुजलावर आधारीत आहेत . तेव्हा माडभुवन वाडीत खड्डा मारून विहिर बांधली तर या गालात मुबलक पाणी पुरवठा होईल याची पाहणी जिल्हा परिषद सदस्य घरत, पनवेल पंचायत समिती पाणी पुरवठा अधिकारी राणे व ग्रामस्थानी करून केली आहे आणि तसी मागणी सरंपंच निकीता भोईर यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे आणि जलजीवन योजना माडभुवन येथे राबवून ही वाडी पाणी टंचाई मुक्त होईल यासाठी धनाजी घरत यांचे प्रयत्न असणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.