लॉकडाउन मुळे मेंढपाळांचा अनेक महिने खडतर प्रवास
सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।
गेले आठ महिने खड्तर प्रवास करीत असताना,पावसाची चाहूल लागली की प्रत्येक मेंढपाळ आपल्या मायभूमी कडे प्रस्थान करीत असतात.मात्र गेल्या वर्षी पासून मेंढपाळ यांना मोठ्या संकटांना समोरे जावे लागले कोरोना मुळे सर्वत्र ठिकाणी लॉक डाउन सुरु झाले असल्यामुळे मेंढपाळ यांना गावोगावी भटकंती करण्यास मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले.
घाटमाथ्यावर चार महिने या मेंढ्यांना मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होत असतो.परंतु पाऊस शांत झाला की पुन्हा एकदा हा धनगर समाज आपल्या जवळील असलेला लावा -जवा घेवून कोकणात येत असतात. साधारण दिवाळी या सणामध्ये या मेंढपाळांचे कोकणात आगमन होत असते.पावसाळ्यात विविध प्रकारची काटेरी वनस्पती निर्माण होत असते.यामुळे त्यांच्या चा-यांचा प्रश्न मार्गी लागत असतो.कोकणात आल्यानंतर मेंढपाळांचा प्रपंच आज इथे तर उद्या तिथे ऑक्टोबर-नोव्हेंबर ते मे -जून दरम्यान उघड्यावरच असतो. सुमारे २५० ते ३०० किलोमीटर मेंढपाळांना चार्यासाठी भटकंती करावी लागत असते.
दरम्यान, पाऊस पडू लागल्याचे चिन्ह निर्माण होत असल्यामुळे मेंढपाळ मेंढय़ांचा कळप घेऊन आपल्या घरी परतीची वाट धरू लागले आहे. पाऊस उशिरा पडला किंवा पावसाने दडी मारली तर मेंढपाळांचा मुक्काम वाढत असतो.कोरोना संकट तौकी चक्री वादळा मुळे यामुळे आपला मोर्चा लवकरच गावाकडे वळविला आहे.साधारण पणे जून महिन्यात मेंढपाळ निघत असतात. काही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निघत असतात त्यातच कोरोना च्या भितीमुळे परतीच्या प्रवासात मेंढपाळ व्यस्त झालेचे चित्र सध्या विविध ठिकाणी पहावयास मिळत आहे.








Be First to Comment