हिंदलको इंडस्ट्रीज कडून अलिबाग कोव्हिडं सेंटरसाठी वीस ऑक्सिजन काँन्स्ट्रेटर अलिबाग तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द
सिटी बेल । अलिबाग । अमूलकुमार जैन ।
ऑक्सिजन अभावी कोव्हिडं रुग्णांची अवस्था गंभीर होत आहे.अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी आदित्य बिर्ला कंपनीच्या तळोजा येथील हिंदाल्को इंडस्ट्रीजने अलिबाग तालुक्यातील कुरुळ ग्रामपंचायत हद्दीतील मौजे आरसीएफ वसाहतीमध्ये असणाऱ्या कोव्हिडं केअर सेंटर येथे वीस ऑक्सिजन काँन्स्ट्रेटर तहसीलदार सचिन सेजाल यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी हिंदाल्को इंडस्ट्रीजचे युनिट हेड सोमोजीत डॉन, युनिटचे एच आर हेड सुधीर मिश्रा,सी एस आर चे लहू रौधल, आरसीएफ कोव्हिडं केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम हुलवन,आरोग्य सेविका स्वागता जैन, सई थळे आदी उपस्थित होते.

हिंदाल्को इंडस्ट्रीजचे युनिट हेड सोमोजीत डॉन, यांनी यावेळी सांगितले की,गेल्या काही दिवसांपासून अलिबाग तालुक्यात पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे.
ऑक्सिजन काँन्स्ट्रेटरचा वापर गोरगरीब जनतेसाठी करण्यात यावा असे कंपनीच्या वतीने सांगितले आहे. सद्यस्थितीत ऑक्सिजन कमतरता भासत आहे.त्याला पर्याय म्हणून ऑक्सिजन काँन्स्ट्रेटर देण्यात आले आहे.सध्या रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासत असुन ही कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे.तसेच ऑक्सिजन निर्मितिसाठी कच्चा माल मागणीप्रमाणे मिळत नाही.त्याचप्रमाणे ऑक्सिजन प्लांटची कमी असल्याने गरजे इतका ऑक्सिजन उत्पादन होत नाही.
त्यामुळे उत्पादित होणाऱ्या ऑक्सिजन वाटप करीत असताना प्रशासनाला नको इतके ताण घ्यावे लागत आहे.प्रशासनाला थोडा हातभार लावण्याच्या दृष्टीने अशा प्रकारे उपकरणे भेट देऊन रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.आणि येत्या काही दिवसांत वीस जम्बो ऑक्सिजन सिलेंडर देण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्ह्यात असणाऱ्या संस्था आणि कंपन्यांना मदत करण्याचे आव्हान केले होते.त्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत हिंदाल्को इंडस्ट्रीजकडून कोव्हिडं कोरोना बाधित रुग्णांना चांगले उपचार मिळून तो लवकरात लवकर बरा व्हावा हाच अट्टहास कायम ठेवीत याच दृष्टिकोनातून केवळ सामाजिक बांधिलकी जपत आरसीएफ कोव्हिडं सेंटरला हिंदाल्को इंडस्ट्रीजकडून वीस ऑक्सिजन काँन्स्ट्रेटर भेट देण्यात आले आहे, असे अलिबाग तहसीलदार सचिन शैजल यांनी सांगितले.








Be First to Comment